मुंबईत 'ग्लोबल कमोडिटी कॉन्क्लेव' (जीसीसी) २०२६ चे उद्घाटन
मुंबई, 13 ऑगस्ट (हिं.स.)। : मुंबईत आज ''ग्लोबल कमोडिटी कॉन्क्लेव'' (जीसीसी) २०२६ चे उद्घाटन झाले. या सत्राची सुरुवात सेबीचे अध्यक्ष श्री तुहिन कांत पांडे यांच्या हस्ते झाली. या प्रसंगी आयएफएससीएचे अध्यक्ष के राजारमन, एमसीएक्सचे अध्यक्ष हर्ष कुमार
मुंबईत आज 'ग्लोबल कमोडिटी कॉन्क्लेव' (जीसीसी) २०२६ चे उद्घाटन


मुंबई, 13 ऑगस्ट (हिं.स.)। : मुंबईत आज 'ग्लोबल कमोडिटी कॉन्क्लेव' (जीसीसी) २०२६ चे उद्घाटन झाले. या सत्राची सुरुवात सेबीचे अध्यक्ष श्री तुहिन कांत पांडे यांच्या हस्ते झाली. या प्रसंगी आयएफएससीएचे अध्यक्ष के राजारमन, एमसीएक्सचे अध्यक्ष हर्ष कुमार भानवाला यांच्यासह देश-विदेशातील अनेक दिग्गज उद्योगपती उपस्थित होते.

ग्लोबल कमोडिटी कॉन्क्लेवमध्ये आपल्या सुरुवातीच्या भाषणात एमसीएक्सच्या एमडी आणि सीईओ प्रवीणा राय म्हणाल्या की, “कमोडिटीचे मोठे उत्पादक आणि ग्राहक म्हणून जागतिक स्तरावर भारताचे महत्त्व सातत्याने वाढत आहे. अशा परिस्थितीत, देशाला मजबूत देशांतर्गत बाजारपेठ, किंमतींमधील चढ-उतारांचे उत्तम व्यवस्थापन आणि जागतिक बाजारपेठेसोबत अधिक जवळच्या समन्वयाची गरज आहे.”

प्रवीणा राय यांनी नमूद केले की, उत्पादन आणि आयातीच्या बाबतीत भारतातील कमोडिटी बाजार सुमारे ५० लाख कोटी रुपयांचा (साधारण ६०० अब्ज डॉलर्स) आहे. असे असूनही, देशाचा मार्केट-टू-जीडीपी रेशो अवघा ३.१ आहे, जो विकसित बाजारपेठांच्या तुलनेत खूपच कमी आहे. स्टील, ॲल्युमिनियम, कोळसा आणि कापसाचे मोठे उत्पादक असण्यासोबतच सोने आणि कच्च्या तेलाचा प्रमुख ग्राहक म्हणून जागतिक स्तरावर भारताचा दबदबा वाढत आहे. यामुळे जागतिक किंमतींमधील चढ-उतारांचा भारतीय बाजारपेठेवर थेट परिणाम होतो. मात्र, हीच परिस्थिती देशात जोखीम व्यवस्थापनासाठी मजबूत देशांतर्गत यंत्रणा विकसित करण्याची मोठी संधी निर्माण करते.

प्रवीणा राय म्हणाल्या, त्यामुळे ही संधी दोन्ही बाजूंनी फायदेशीर आहे. यातून एकीकडे किंमतींमधील चढ-उतारांपासून संरक्षण मिळते, तर दुसरीकडे या बाजारपेठांमध्ये गुंतवणूक आणि सहभागाची मोठी संधी उपलब्ध होते.

जागतिक बाजारपेठेसोबत जोडले जाणे हाच या कॉन्क्लेवचा मुख्य संदेश आहे, असे प्रवीणा राय यांनी स्पष्ट केले. त्यांनी सांगितले की, पुढील तीन दिवस चालणार असलेल्या या कॉन्क्लेवमध्ये भारतीय कमोडिटी बेंचमार्क, अचूक किंमती शोधणे, चलन जोखीम व्यवस्थापन आणि रुपयाचे हेजिंग यांसारख्या महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा होईल. देशांतर्गत कमोडिटी बाजार मजबूत करणे आणि त्याला जागतिक स्तरावर जोडणे या मोठ्या उद्दिष्टाचा भाग म्हणून, या कॉन्क्लेवमध्ये भारतीय एक्सचेंजेस, नियामक, उद्योग संघटना, उत्पादक आणि ग्राहकांसह सीएमई आणि एलएमई सारखे जागतिक एक्सचेंजेस देखील सहभागी होत आहेत.

'फिजिकल आणि फायनान्शियल मार्केटचे एकत्रीकरण' (कन्व्हरजन्स ऑफ फिजिकल अँड फायनान्शियल मार्केट्स) या थीमवर आधारित हे तीन दिवसीय संमेलन मल्टी कमोडिटी एक्सचेंज ऑफ इंडियाच्या सहकार्याने आयोजित करण्यात आले असून ते १४ ऑगस्टपर्यंत चालेल.

यामध्ये बुलियन, बेस मेटल्स, एनर्जी, ॲग्री-कमोडिटीज, कोळसा आणि कॅपिटल मार्केटवर विशेष सत्रे आयोजित केली जातील. तसेच तंत्रज्ञान, किरकोळ गुंतवणूकदारांचा (रिटेल) सहभाग आणि हवामान बदलामुळे उद्भवणारे धोके या विषयांवरही चर्चा होईल. कॉन्क्लेवच्या तिसऱ्या आणि अंतिम दिवशी रिटेल सेगमेंटच्या विशेष सत्राने आणि समारोपाच्या भाषणाने या कार्यक्रमाची सांगता होईल.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande