स्वातंत्र्यदिनी भारतातील वाढते जीवन विमा संरक्षण आर्थिक सज्जतेतील सकारात्मक बदलाचे संकेत
मुंबई, 14 ऑगस्ट (हिं.स.) - भारताच्या विमा माहिती ब्युरोने (IIB) संकलित केलेल्या आर्थिक वर्ष २०२१ ते आर्थिक वर्ष २०२५ या कालावधीतील जीवन विमा व्यवसायाच्या आकडेवारीच्या विश्लेषणातून भारताच्या विमा संरक्षणाच्या स्थितीत सकारात्मक बदल होत असल्याचे दिसून
life insurance


मुंबई, 14 ऑगस्ट (हिं.स.) - भारताच्या विमा माहिती ब्युरोने (IIB) संकलित केलेल्या आर्थिक वर्ष २०२१ ते आर्थिक वर्ष २०२५ या कालावधीतील जीवन विमा व्यवसायाच्या आकडेवारीच्या विश्लेषणातून भारताच्या विमा संरक्षणाच्या स्थितीत सकारात्मक बदल होत असल्याचे दिसून येते.

आधीपासून जीवन विमा घेतलेले ग्राहक अधिक व्यापक आर्थिक संरक्षणासाठी आता वाढीव विमा संरक्षणाची निवड करत आहेत. जीवनचक्रातील बदलांनुसार जबाबदाऱ्याही बदलतात. हे लक्षात घेऊन ग्राहक आपल्या विमा संरक्षणात सातत्याने वाढ करत आहेत. या बदलत्या प्रवाहातून दीर्घकालीन आर्थिक सुरक्षिततेचे साधन म्हणून जीवन विम्यावरील ग्राहकांचा वाढता विश्वास दिसून येतो. विमा संरक्षणाची सुरुवात लवकर करण्याचे फायदेही यातून अधोरेखित होतात.

IIBच्या विश्लेषणातून गेल्या पाच वर्षांत जीवन विम्याच्या सर्व पॉलिसी श्रेणींमध्ये अधिक रकमेच्या विमा संरक्षणाकडे स्पष्ट कल दिसून येतो. आर्थिक वर्ष २०२१ ते आर्थिक वर्ष२०२५ या कालावधीत अधिक विमा रक्कम असलेल्या श्रेणींच्या प्रमाणात सातत्याने वाढझाली. पॉलिसी धारकांमध्ये अधिक व्यापक विमा संरक्षण घेण्याचा स्पष्ट कल यातून दिसतो. ₹२ लाख ते ₹५ लाख विमा रक्कम असलेल्या पॉलिसींच्या प्रमाणात ५.६ टक्के अंकांची वाढ झाली. ₹१० लाख ते ₹२५ लाख विमा रक्कम असलेल्या पॉलिसींच्या प्रमाणात २ टक्के अंकांची वाढ झाली. ₹५० लाखांपेक्षा अधिक विमा रक्कम असलेल्या पॉलिसींची संख्या ६८ टक्क्यांनी वाढली. ती आर्थिक वर्ष २०२१ मधील ४४ लाखांवरून आर्थिक वर्ष २०२५ मध्ये ७४ लाखांवर पोहोचली. या पॉलिसींमधून ₹९७५ अब्जांचा वार्षिक प्रीमियम मिळाला.

दरम्यान, आर्थिक वर्ष २०२१ मध्ये अस्तित्वात असलेल्या जीवन विमा पॉलिसींपैकी जवळपास दोन तृतीयांश म्हणजेच ६५.१ टक्के पॉलिसींची विमा रक्कम ₹२ लाख किंवा त्यापेक्षा कमी होती. आर्थिक वर्ष २०२५ मध्ये हे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी होऊन ५३.६ टक्क्यांवर आले. याच कालावधीत अधिक विमा रक्कम असलेल्या प्रत्येक श्रेणीत सातत्याने वाढ झाली.

पॉलिसीधारक आपल्या आर्थिक संरक्षणासाठी सातत्याने अधिक खर्च करत असल्याचेही या आकडेवारीतून दिसून येते. गेल्या पाच वर्षांत अस्तित्वात असलेल्या जीवन विमा पॉलिसींची एकूण संख्या सुमारे ३४३ दशलक्ष म्हणजेच ३४.३ कोटींवर स्थिर राहिली. मात्र, प्रत्येक पॉलिसीमागील सरासरी वार्षिक प्रीमियम ४२.६ टक्क्यांनी वाढला. तो आर्थिक वर्ष २०२१ मधील ₹१५,५६७ वरून आर्थिक वर्ष २०२५ मध्ये ₹२२,१९५ झाला. या दोन्ही प्रवाहांचा एकत्रित विचार केला तर पॉलिसीधारक कालांतराने आपल्या विमा संरक्षणात वाढ करत असल्याचे दिसते. जीवन विम्याकडे केवळ एकदाच केली जाणारी किंवा करबचतीसाठी केली जाणारी खरेदी म्हणून पाहिले जात नाही.

विमा जागरूकता समिती (IAC)-Life चे अध्यक्ष श्री. कमलेश राव म्हणाले, “IIBची आकडेवारी स्पष्टपणे दाखवते की, जीवन विम्यात दीर्घकाळ टिकून राहणारे भारतीयत्याचे महत्त्व अधिकाधिक ओळखत आहेत. जीवनातील बदल आणि वाढत्या जबाबदाऱ्यांनुसार तेआपल्या विमा संरक्षणात वाढ करत आहेत. पॉलिसीधारक सातत्याने अधिक विमा संरक्षणाकडे वळत आहेत, ही सकारात्मक बाब आहे. स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी आर्थिक सुरक्षितता सुनिश्चित करण्याची त्यांची बांधिलकी यातून दिसून येते. ज्यांनी अद्याप जीवन विम्याची सुरुवात केलेली नाही, त्यांच्यासाठी संदेश साधा आहे—विमा संरक्षणाची सुरुवात जितकी लवकर कराल, तितका व्यापक आर्थिक बचाव उभारण्यासाठी अधिक वेळ मिळेल. हे संरक्षण आपल्या आकांक्षा आणि जबाबदाऱ्यांसोबत वाढवता येते.”

अधिक विमा संरक्षण आणि प्रीमियमवरील वाढत्या खर्चामागे अनेक घटक आहेत. जीवन विम्याचे महत्त्व वाढल्याची जाणीव, उत्पन्नातील वाढ, महागाई, जीवनातील बदलते टप्पे आणि वाढत्या जबाबदाऱ्या यामुळे व्यापक विमा संरक्षणाची मागणी वाढली आहे. कोविड-१९ महामारी आणि त्यानंतरच्या परिस्थितीनेही विमा संरक्षणातील त्रुटी अधोरेखित केल्या. त्यामुळे अनेकांनी आपल्या आर्थिक सक्षमतेचा पुन्हा आढावा घेतला.

त्याचवेळी, विमा कंपन्यांनी ग्राहकांच्या विविध गरजा लक्षात घेऊन अधिक अनुरूप उपाय उपलब्ध करून दिले आहेत. त्यामुळे जीवन विमा अधिक उपयुक्त आणि सुलभ झाला आहे. महत्त्वाचे म्हणजे, ग्राहकांना जीवन विम्याचे वैशिष्ट्यपूर्ण मूल्य समजले आहे. दीर्घकालीन संरक्षण आणि आर्थिक सुरक्षिततेचे साधन म्हणून जीवन विमा इतर गुंतवणूक पर्यायांना पूरक ठरतो. इतर पारंपरिक बचत किंवा गुंतवणूक उत्पादने प्रामुख्याने संपत्ती निर्माण करण्यास मदत करतात. जीवन विमा मात्र त्याचबरोबर जोखीम आणि बाजारातील अस्थिरतेपासून संरक्षण देतो.

विमा जागरूकता समिती – Life (IAC-Life) ने सांगितले की, हे बदलते प्रवाह जीवन विम्याकडे एकदाचकेली जाणारी खरेदी म्हणून न पाहता आयुष्यभराचा आर्थिक साथीदार म्हणून पाहण्याचे महत्त्व अधोरेखित करतात. लहान वयात सुरुवात केल्यास व्यक्तींना कमी वयात विमा संरक्षण मिळवता येते. त्यांना तुलनेने कमी प्रीमियमचा लाभ मिळतो. उत्पन्न, जबाबदाऱ्या आणि दीर्घकालीन आर्थिक उद्दिष्टे वाढत जातील तसे विमा संरक्षणात टप्प्याटप्प्याने वाढकरता येते.

IAC-Life IIBच्या अभ्यासातून मिळणाऱ्या निष्कर्षांचा वापर करून पुढेही लक्ष्यित जनजागृती उपक्रम राबवणार आहे. अधिकाधिक भारतीयांनी लवकर जीवन विम्याची सुरुवात करावी, यासाठी हे उपक्रम राबवले जातील. पुरेसे आणि बदलत्या गरजांनुसार वाढवता येणारे विमा संरक्षण घेऊन दीर्घकालीन आर्थिक सक्षमतेची उभारणी करण्यासाठीही जनजागृती केली जाईल.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande