शाश्वत वाढ साध्य करणाऱ्या फिनटेक कंपन्यांना दीर्घकालीन यशाची शक्यता अधिक
सध्याच्या काळात स्टार्टअप्समध्ये वेगाने वाढ होतं आहे. त्या दरम्यान फिनटेक उद्योगांची सध्याची स्थिती आणि यापुढे भविष्यातील दीर्घकालीन यशासाठी आणखी काय करणे आवश्यक आहे, यासाठी फटाकपेचे (फटाकPAY) सह-संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक अमित गोयल यांच्याशी
अमित गोयल


Fatakpay


सध्याच्या काळात स्टार्टअप्समध्ये वेगाने वाढ होतं आहे. त्या दरम्यान फिनटेक उद्योगांची सध्याची स्थिती आणि यापुढे भविष्यातील दीर्घकालीन यशासाठी आणखी काय करणे आवश्यक आहे, यासाठी फटाकपेचे (फटाकPAY) सह-संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक अमित गोयल यांच्याशी केलेल्या विशेष चर्चेचा सारांश...

प्रश्न 1. गेल्या काही वर्षांत अनेक स्टार्टअप्सची वेगाने वाढ झाली आणि त्यानंतर त्यांना अडचणींचा सामना करावा लागला. या बदलातून फिनटेक क्षेत्रातील शाश्वत वाढीच्या महत्त्वाबद्दल काय दिसून येते?

अनेक वर्षांपासून भारतातील स्टार्टअप परिसंस्थेत वृद्धी, व्यवसायाचा विस्तार, फंडिंगच्या फेऱ्या आणि ग्राहकांच्या संख्येत वाढ हेच यशाचे प्रमुख निकष मानले जात होते. मात्र, कोविड-19 महामारीनंतर झालेली उलथापालथ आणि अनेक नव्या कंपन्यांची झालेली वेगवान वाढ व त्यानंतर आलेल्या अडचणींमुळे शाश्वत आणि दीर्घकालीन धोरणात्मक वाढीचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. फिनटेक क्षेत्रात आता गुंतवणूक करताना अधिक विचारपूर्वक निर्णय घेतले जात आहेत. कंपनीचे मूल्यांकन जितके महत्त्वाचे आहे, तितकीच व्यवसायाची व्यवहार्यता आणि दीर्घकालीन धोरणेही महत्त्वाची ठरत आहेत. त्याचबरोबर प्रत्येक व्यवहारातून होणारे उत्पन्न आणि खर्च यांचे योग्य गणित, शिस्तबद्ध वाढ आणि नफा मिळवण्याचा स्पष्ट मार्ग यांवर अधिक भर देण्यात येतआहे.

प्रश्न 2. फिनटेक उद्योग आता केवळ व्यवसायाचा विस्तार करण्याऐवजी नफा आणि व्यवसायाच्या मूलभूत बाबींवर अधिक लक्ष केंद्रित करत आहे, असे तुम्हाला वाटते का? हा बदल कशामुळे होत आहे?

होय. दीर्घकालीन यशासाठी केवळ व्यवसायाचा विस्तार आणि वाढ यांचा पाठपुरावा करणे पुरेसे ठरणार नाही, याची जाणीव फिनटेक उद्योगाला झाली आहे. गेल्या दशकात, विशेषतः नोटाबंदी आणि महामारीसारख्या महत्त्वाच्या कालखंडात या क्षेत्रात झालेल्या मोठ्या बदलांमधून उद्योगाने अनेक धडे घेतले आहेत. कंपन्यांची संचालक मंडळे, गुंतवणूकदार आणि नियामक यांच्यात होणाऱ्या चर्चेचे स्वरूप बदलले असून, गुंतवणूक करतानाही अधिक विचारपूर्वक निर्णय घेण्यात येत आहेत. भारतातील फिनटेक क्षेत्राने 2021च्या उत्तरार्धात 5.5 अब्ज अमेरिकी डॉलरचा निधी उभारला होता. त्या तुलनेत 2025च्या पहिल्या सहामाहीत केवळ 889 दशलक्ष अमेरिकी डॉलरचा निधी उभारण्यात आला, यावरून हा बदल स्पष्ट होतो. थोडक्यात, प्रत्येक व्यवहारातून होणारे उत्पन्न आणि खर्च यांचे योग्य गणित, शिस्तबद्ध वाढ आणि नफा मिळवण्याचा स्पष्ट मार्ग असलेल्या व्यवसायांना आता अधिक महत्त्व दिले जात आहे.

प्रश्न 3. गुंतवणूकदार, ग्राहक आणि नियामकांच्या बदलत्या अपेक्षांचा फिनटेक कंपन्यांच्या व्यवसाय उभारणीच्या पद्धतीवर कसा परिणाम होत आहे?

प्रत्येक भागधारकाकडून आता शाश्वततेला अधिक महत्त्व देण्यात येत आहे. गुंतवणूकदारांकडून व्यवसायाच्या मूलभूत बाबी आणि दीर्घकाळ टिकणारे मूल्य निर्माण करण्यावर भर देण्यात येत आहे. त्याच वेळी आपली बचत, कर्ज आणि आर्थिक माहिती कोणत्या प्लॅटफॉर्मवर विश्वासाने सोपवता येईल, याचा ग्राहक विचार करत आहेत. ग्राहकांच्या हिताचे संरक्षण कशा प्रकारे केले जात आहे, याकडेही नियामकांकडून बारकाईने लक्ष दिले जात आहे. या सर्वांमुळे फिनटेक कंपन्यांसाठी जबाबदार, पारदर्शक आणि बदलत्या परिस्थितीत टिकून राहू शकतील अशा व्यावसायिक पद्धतींचे महत्त्व वाढत आहे.

प्रश्न 4. ग्राहक मिळवण्यासाठी फिनटेक क्षेत्रात पारंपरिकपणे इन्सेन्टिव्ह आणि प्रमोशनल ऑफर्सवर मोठ्या प्रमाणात भर दिला जात होता. या पद्धतीमध्ये आता बदल होत असल्याचे तुम्हाला दिसत आहे का?

होय. इन्सेन्टिव्ह, डिस्काउंट्स आणि प्रमोशनल ऑफर्समुळे डिजिटल सेवांचा स्वीकार वेगाने वाढण्यासमदत झाली आणि कोट्यवधी भारतीयांची डिजिटल आर्थिक सेवांशी ओळख झाली. मात्र आता केवळनवे ग्राहक मिळवण्याऐवजी त्यांना दीर्घकाळ आपल्यासोबत टिकवून ठेवण्यावर अधिक भरद्यावा लागणार आहे. शाश्वत व्यवसाय उभारणाऱ्या कंपन्यांकडून ग्राहकांच्या दैनंदिन आर्थिक गरजा पूर्ण करण्यावर भर दिला जात आहे. तसेच केवळ काही काळासाठी इन्सेन्टिव्ह मिळत आहेत म्हणून नव्हे, तर उपयुक्त, वापरण्यास सोपी आणि विश्वासार्ह असल्यामुळे ग्राहक सातत्याने वापरतील अशा सेवा विकसित करण्यात येत आहेत.

प्रश्न 5. उत्पन्नाचे अधिक शाश्वत आणि विविध स्रोत निर्माण करण्यासाठी फिनटेक कंपन्यांना कोणत्या प्रकारची बिझनेस मॉडेल्स उपयुक्त ठरू शकतात?

एकाच प्लॅटफॉर्मवर विविध सेवा उपलब्ध करून देणाऱ्या फिनटेक कंपन्यांना शाश्वत व्यवसाय उभारण्यात इतरांच्या तुलनेत फायदा होऊ शकतो. उदाहरणार्थ, एखादा ग्राहक ॲपच्या माध्यमातून कर्ज घेऊ शकतो आणि त्याच वेळी शेअर्समध्ये गुंतवणूक करू शकतो, थर्ड-पार्टी सेवा पुरवठादाराकडून कार इन्शुरन्स खरेदी करू शकतो तसेच युपीआयच्या माध्यमातून पेमेंटही करू शकतो. यामुळे ग्राहकांना एकाच ठिकाणी विविध सेवांची सोय मिळते. त्याचवेळी कमिशन, ब्रोकरेज आणि इतर माध्यमांतून फिनटेक कंपन्यांना उत्पन्नाचे विविध स्रोत उपलब्ध होतात. याशिवाय व्यवसायात अशा प्रकारे विविधता आणल्यामुळे बाजारपेठेतील अनिश्चित चढ-उतारांचा सामना करणेही तुलनेने सोपे होऊ शकते.

प्रश्न 6. नव्या आणि पुरेशा सेवा न मिळालेल्या ग्राहकांपर्यंत फिनटेक कंपन्या पोहोचत असताना, ग्राहकांशी दीर्घकालीन संबंध निर्माण करण्यात विश्वास किती महत्त्वाचा ठरणार आहे?

विश्वास अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. विशेषतः फिनटेक कंपन्यांच्या माध्यमातून डिजिटल आणि अनेकदा प्रत्यक्ष मानवी संपर्क नसलेल्या प्लॅटफॉर्मवर लोकांचे आर्थिक व्यवहार करण्यात येत असल्यामुळे विश्वासाचे महत्त्व आणखी वाढते. विश्वासामुळे ग्राहकांना दीर्घकाळ जोडून ठेवण्यास मदत होते, सेवांचा वारंवार वापर आणि त्या वापरण्याची इतरांना शिफारस करण्यास प्रोत्साहन मिळते, भागीदारी अधिक मजबूत होते आणि दीर्घकाळात नवीन ग्राहक मिळवण्यासाठी येणारा खर्च कमी होतो. उत्पादने किंवा सेवांची नक्कल सहज करता येऊ शकते, मात्र विश्वास निर्माण करणे आणि त्याची जागा दुसऱ्या गोष्टीने भरून काढणे खूप कठीण असते. त्यामुळे पारदर्शक किंमत, सोपी व्यवहार प्रक्रिया, तक्रारींचे विनासायास निराकरण आणि वैयक्तिक माहितीचा जबाबदारीने वापर या बाबी फिनटेक कंपनीच्या यशामध्ये महत्त्वाची भूमिका बजावू शकतात.

प्रश्न 7. भविष्यात दीर्घकालीन यश मिळवणाऱ्या फिनटेक कंपन्या आणि प्रामुख्याने वेगवान वाढीवर भर देणाऱ्या कंपन्या यांच्यात कोणत्या बाबींमुळे फरक पडेल, असे तुम्हाला वाटते?

वेगाने पुढे जाण्याच्या शर्यतीपेक्षा मॅरेथॉनप्रमाणे दीर्घकालीन वाटचाल करणाऱ्या फिनटेक कंपन्यांना दीर्घकाळ यशस्वी होण्याची अधिक संधी असू शकते. शाश्वत वाढ, ग्राहकांचा विश्वास, जबाबदार व्यावसायिक पद्धती आणि ग्राहकांच्या दैनंदिन आर्थिक गरजा सोडवण्यावर सातत्याने देण्यात येणारा भर या बाबींमुळे यशस्वी कंपन्या इतरांपेक्षा वेगळ्या ठरणार आहेत. तंत्रज्ञानाचा वापर आणि तंत्रज्ञान विषयक ज्ञान वाढत असताना लोकांशी आणि त्यांच्या पैशांशी फिनटेक कंपन्यांचा अधिकाधिक संबंध येत आहे. उपलब्ध माहितीनुसार, केवळ वेगवान वाढीवर भर देणाऱ्या कंपन्यांच्या तुलनेने शाश्वत वाढ साध्य करणाऱ्या फिनटेक कंपन्यांना दीर्घकालीन यश मिळण्याची शक्यता अधिक आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande