स्कायवेज एअर सर्व्हिसेस लिमिटेडचा आयपीओ २४ ऑगस्टला होणार खुला
नवी दिल्ली, 14 ऑगस्ट (हिं.स.)। स्कायवेज एअर सर्व्हिसेस लिमिटेडचा प्रारंभिक सार्वजनिक निर्गम (आयपीओ) २४ ऑगस्टला उघडणार आहे. गुंतवणूकदार यामध्ये गुंतवणुकीसाठी २७ ऑगस्टपर्यंत बोली लावू शकतात. कंपनीने यासाठी प्राइस बँड १३१-१३८ रुपये प्रति शेअर निश्चित
Skyways Air Services Limiteds IPO


नवी दिल्ली, 14 ऑगस्ट (हिं.स.)। स्कायवेज एअर सर्व्हिसेस लिमिटेडचा प्रारंभिक सार्वजनिक निर्गम (आयपीओ) २४ ऑगस्टला उघडणार आहे. गुंतवणूकदार यामध्ये गुंतवणुकीसाठी २७ ऑगस्टपर्यंत बोली लावू शकतात. कंपनीने यासाठी प्राइस बँड १३१-१३८ रुपये प्रति शेअर निश्चित केला आहे. यामध्ये मोठे (अँकर) गुंतवणूकदार २१ ऑगस्टला गुंतवणुकीसाठी बोली लावू शकतील.

स्कायवेज एअर सर्व्हिसेस लिमिटेडनुसार, १० रुपये दर्शनी मूल्य असलेल्या या इश्यूमध्ये गुंतवणूकदार कमीत कमी १०० इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर १०० इक्विटी शेअर्सच्या पटीत बोली लावू शकतात. कंपनीचे शेअर्स १ सप्टेंबर २०२६ रोजी बीएसई आणि एनएसईवर लिस्ट होण्याचा प्रस्ताव आहे. एअर फ्रेट कंपनी स्कायवेज एअर सर्व्हिसेस लिमिटेडचे उद्दिष्ट या आयपीओच्या माध्यमातून ५८३ कोटी रुपये उभारण्याचे आहे. कंपनीने सांगितले की, आयपीओमध्ये २.८९ कोटी नवीन शेअर्स आणि १.३३ कोटी शेअर्सची ऑफर फॉर सेल (ओएफएस) समाविष्ट आहे.

कंपनीच्या सार्वजनिक घोषणेनुसार, प्राइस बँडच्या खालच्या स्तरावर या इश्यूचा आकार ५५३ कोटी रुपये आणि वरच्या स्तरावर ५८३ कोटी रुपये राहण्याचा अंदाज आहे. नवीन शेअर्सच्या इश्यूमधून मिळणाऱ्या रकमेचा वापर कर्ज फेडण्यासाठी, कंपनीच्या अतिरिक्त वर्किंग कॅपिटलच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि कंपनीच्या सामान्य कामकाजासाठी केला जाणार आहे.

१९८४ मध्ये स्थापन झालेली ही कंपनी भारताच्या एअर फ्रेट फॉरवर्डिंग आणि लॉजिस्टिक्स सेक्टरमध्ये दीर्घकाळापासून कार्यरत आहे. वर्ल्ड एसीडीनुसार, गेल्या चार कॅलेंडर वर्षांमध्ये (२०२५, २०२४, २०२३ आणि २०२२) एडब्ल्यूबी जनरेशनच्या बाबतीत ही कंपनी सातत्याने नंबर १ एअर फ्रेट फॉरवर्डर राहिली आहे. तसेच, भारतातून जगभरात सर्वाधिक एअर कार्गो कन्साइनमेंट हाताळणाऱ्या कंपन्यांपैकी ही एक आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande