
बीड, 15 ऑगस्ट (हिं.स.)।
बल सागर भारत होवो, विश्वात शोभून राहो..! या गीतासह
पोलिस परेड मैदान, अंबाजोगाई येथे आमदार नमिता मुंदडा यांच्या उपस्थितीत एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते
भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने पोलिस परेड मैदान, अंबाजोगाई शहर पोलिस स्टेशन येथे शासकीय ध्वजारोहण सोहळा अप्पर जिल्हाधिकारी श्रीमती अश्विनी जिरंगे-सोनवणे यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी आमदार नमिता मुंदडा उपस्थित राहून राष्ट्रध्वजाला अभिमानाने मानवंदना दिली.
याप्रसंगी अंबाजोगाई नगर परिषदेचे नगराध्यक्ष नंदकिशोरजी (काकाजी) मुंदडा, पन्नगेश्वर शुगर मिल्सचे चेअरमन श्री. अक्षय मुंदडा, उपजिल्हाधिकारी श्री. दीपक वजाळे, यांच्यासह शहरातील नागरिक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis