चाकूर येथील नवनिर्मित शासकीय विश्रामगृह इमारतीचे शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या हस्ते लोकार्पण
लातूर, 15 ऑगस्ट (हिं.स.) : जिल्ह्यातील चाकूर येथे उभारण्यात आलेल्या शासकीय विश्रामगृह इमारतीचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते आज लोकार्पण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील होते. या कार्यक्रमाल
पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले


लातूर, 15 ऑगस्ट (हिं.स.) : जिल्ह्यातील चाकूर येथे उभारण्यात आलेल्या शासकीय विश्रामगृह इमारतीचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते आज लोकार्पण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील होते.

या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष दयानंद सुरवसे, चाकूरचे नगराध्यक्ष भागवत फुले, जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड, पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अहमदपूरच्या उपविभागीय अधिकारी मंजुषा लटपटे, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंता रूपा राऊळ, अधीक्षक अभियंता बाबासाहेब थोरात, चाकूरचे तहसीलदार नरसिंग जाधव, कार्यकारी अभियंता एस. जी. केंद्रे, उपअभियंता एस. एम. गोंड यांच्यासह लोकप्रतिनिधी, अधिकारी यावेळी उपस्थित होते.चाकूर येथील नवनिर्मित शासकीय विश्रामगृह इमारतीमध्ये एकूण ५ अद्ययावत कक्ष आहेत. यामध्ये एका व्हीआयपी कक्ष, तसेच भोजन कक्ष, स्वयंपाकगृह, प्रतीक्षा कक्षाचा समावेश आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande