
बीड, 15 ऑगस्ट (हिं.स.)।
पाडळशिंगी येथे गो ग्रीन फास्ट चार्जिंग स्टेशनचा शुभारंभ ह.भ.प. संभाजी महाराज, ओंकार महाराज,राम महाराज शास्त्री तसेच माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचे सुपुत्र रोहित क्षीरसागर यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाला.
आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात इलेक्ट्रिक वाहनांचा वापर झपाट्याने वाढत आहे.भविष्यातील गरज लक्षात घेता महामार्गावर जलद चार्जिंगची सुविधा उपलब्ध असणे अत्यंत आवश्यक आहे. याच उद्देशाने गो ग्रीन फास्ट चार्जिंग स्टेशनची सुरुवात करण्यात आली आहे.
पर्यावरणपूरक वाहतुकीला चालना देणारे आणि इलेक्ट्रिक वाहनधारकांसाठी सोयीचे ठरणारे हे चार्जिंग स्टेशन निश्चितच एक महत्त्वाचे पाऊल आहे.
गो ग्रीन… स्वच्छ, सुरक्षित आणि आधुनिक भविष्यासाठी! असल्याचे त्यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis