अमरावती - अतितीव्र लाईटच्या वापरप्रकरणी ४१७ वाहनांवर कारवाई
अमरावती, 15 ऑगस्ट (हिं.स.)। रात्रीच्या वेळी वाहन चालविताना वाहनांच्या अतितीव्र व डोळे दिपवणारा प्रकाशाचे लाइट वापरणाऱ्या २९९ वाहनांवर ग्रामिण पोलिसांनी ३१ ठाण्याच्या हद्दीत ऑपरेशन कवच अंतर्गत कारवाई केली आहे. त्यातील ११८ अशा एकूण ४१७ वाहनांवर वाहत
अतितीव्र लाईटचा वापर करणाऱ्यांवर कारवाई करणारे पथक.


अमरावती, 15 ऑगस्ट (हिं.स.)।

रात्रीच्या वेळी वाहन चालविताना वाहनांच्या अतितीव्र व डोळे दिपवणारा प्रकाशाचे लाइट वापरणाऱ्या २९९ वाहनांवर ग्रामिण पोलिसांनी ३१ ठाण्याच्या हद्दीत ऑपरेशन कवच अंतर्गत कारवाई केली आहे. त्यातील ११८ अशा एकूण ४१७ वाहनांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली. अशा प्रकारच्या लाईटचा वापर केल्याने रात्रीच्या वेळी वाहन चालविताना वाहनचालकांच्या दृष्टीवर विपरीत परिणाम होऊन अपघात होण्याची शक्यता वाढते. तसेच इतर वाहनचालक व सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होऊन गैरसोय निर्माण होते. या पार्श्वभूमिवर ऑपरेशन कवच अंतर्गत जिल्ह्यात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अशा वाहनचालकांविरुद्ध विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली. त्यात १३ ऑगस्टला केलेल्या ३१ ठाण्याच्या हद्दीतील हायबीम, अतितीव्र प्रकाशाचे, स्पॉट लाइट, सर्च लाइट संदर्भात २०० वाहनांवर कारवाई केली. वाहतूक पोलिस व संबंधित ठेवण्यांची एकूण जवळपास ४१७ वाहनांवर कारवाई करून २ लाख १० हजारांचा दंड आकारण्यात आला आहे. पोलिस अधीक्षक निकेतन कदम, अपर पोलिस अधीक्षक दत्ता तोटेवाड, उपविभागीय पोलिस अधिकारी वैशाली भोये, यांच्या मार्गदर्शनता ठाणेदार व जिल्हा वाहतूक शाखेने ही कारवाई केली.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande