‘इतिहास महाराष्ट्राचा’ अंतिम फेरीत अमरावतीचा डंका
अमरावती, 15 ऑगस्ट (हिं.स.)। बालरंगभूमी परिषद, मध्यवर्ती, मुंबईतर्फे दरवर्षी संपूर्ण महाराष्ट्रातील २८ केंद्रावर ‘इतिहास महाराष्ट्राचा’ या कार्यक्रमाच्या रूपाने ऐतिहासिक चरित्रांवर एकपात्री, नाट्यछटा, स्वगत, नाटूकले सादरीकरण महोत्सव साजरा केला जातो
‘इतिहास महाराष्ट्राचा’ अंतिम फेरीत अमरावतीचा डंका


अमरावती, 15 ऑगस्ट (हिं.स.)।

बालरंगभूमी परिषद, मध्यवर्ती, मुंबईतर्फे दरवर्षी संपूर्ण महाराष्ट्रातील २८ केंद्रावर ‘इतिहास महाराष्ट्राचा’ या कार्यक्रमाच्या रूपाने ऐतिहासिक चरित्रांवर एकपात्री, नाट्यछटा, स्वगत, नाटूकले सादरीकरण महोत्सव साजरा केला जातो. यावर्षी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जीवनकार्य यावर एकपात्री, नाट्यछटा, स्वगत, नाटूकले सादरीकरण महोत्सव स्थानिक सोमेश्वर पुसतकर सभागृह येथे बाल नाट्य दिनानिमित्य साजरा करण्यात आला होता. त्यातील एकल मोठा गट यामध्ये सायली जुमडे सर्वोत्कृष्ट ठरून अंतिम फेरीत दाखल झाली होती. यामध्ये २५ केंद्रातून सर्वोत्कृष्ट स्पर्धक महोत्सवात दाखल झाले होते. सायली जुमडे हिने एकल मोठा गट यामध्ये सर्वोत्कृष्ट पारितोषिक ३ हजार रुपये रोख, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र प्राप्त केले.

कला आणि इतिहासाचा अप्रतिम संगम असलेल्या या महाअंतिम फेरीत आपल्या दमदार अभिनयाने बालकलावंतांनी उपस्थितांचे मन जिंकले. ख्यातनाम अभिनेते व तज्ज्ञ परीक्षक संजय हळदीकर (कोल्हापूर), प्रा. डॉ. गणेश चंदनशिवे (मुंबई) आणि अभिनेते दिगंबर नाईक (मुंबई) यांनी स्पर्धेचे परीक्षण केले. सायली जुमडे हिला सिने अभिनेत्री व बालरंगभूमी परिषद, मध्यवर्ती, मुंबईच्या अध्यक्ष नीलम शिर्के–सामंत यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. अमरावती जिल्हा शाखेचे पदाधिकारी मंगेश बक्षी, विशाल रमेश तराळ, संजीवनी पुरोहित, भूषण उंबरकर, स्वाती तराळ, स्वेहा तराळ यांनी सायलीचे विशेष अभिनंदन केले. सर्व स्तरावरून सायलीवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande