चंद्रपूर : 17 हजार 755 घरकुल पूर्ण
चंद्रपूर, 15 ऑगस्ट (हिं.स.)। प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना टप्पा - 2 अंतर्गत 17 हजार 755 घरकुल पूर्ण तर जनमन अंतर्गत 235 घरकुल पूर्ण झाले आहे अशी माहिती राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी येथे बो
चंद्रपूर : 17 हजार 755 घरकुल पूर्ण


चंद्रपूर, 15 ऑगस्ट (हिं.स.)।

प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना टप्पा - 2 अंतर्गत 17 हजार 755 घरकुल पूर्ण तर जनमन अंतर्गत 235 घरकुल पूर्ण झाले आहे अशी माहिती राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी येथे बोलताना दिली.

स्वातंत्र्यदिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमात ते बोलत होते.

राज्य पुरस्कृत रमाई, शबरी, आदिम, पारधी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी, मोदी आावास, यशवंतराव चव्हाण वसाहत योजना अंतर्गत एकूण 51 हजार 378 घरकुल पूर्ण झाली आहेत. सन 2026-27 साठी चंद्रपूर जिल्ह्याचे वार्षिक पत उद्दिष्ट 10 हजार कोटी आहे. पहिल्या तिमाहीतच 4 हजार 836 कोटींचे कर्ज वितरण झाले आहे. यामध्ये शेतकऱ्यांसाठी 994 कोटींचे पीक कर्ज वितरित करण्यात आले आहे असे डॉ. अशोक उईके म्हणाले.

पाणलोट विकास व शाश्वत विकासासाठी मृदसंधारण व जलसंधारण आवश्यक आहे. त्याचे महत्व पटवून देण्यासाठी राज्यात 15 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट 2026 या कालावधीत जलसंधारण सप्ताह राबविण्यात येणार आहे. या सप्ताहाचा आजपासून शुभारंभ झाला, असे घोषित करून या उपक्रमात सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी केले.

यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते मृद व जलसंधारण सप्ताह निमित्त लोगोचा शुभारंभ करण्यात आला.

---------------

हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव


 rajesh pande