चंद्रपूर : पालकमंत्र्यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार
चंद्रपूर, 15 ऑगस्ट (हिं.स.)। स्वातंत्र्यदिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी पालकमंत्र्
चंद्रपूर : पालकमंत्र्यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार


चंद्रपूर, 15 ऑगस्ट (हिं.स.)।

स्वातंत्र्यदिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

अवयव दान केलेले संजय खाटीक, बबन आंबेकर, जिल्हा सामान्य रुग्णालयातील सहाय्यक परिचारिका उज्वला सोयाम, वैद्यकीय अधीक्षक मनीष सिंग, विवेक मसराम, राज्यस्तरीय शेतकरी पुरस्कार प्राप्त अरुण केदार, लीलाराम पिदुरकर, तुळशीराम मोरे, हरिश्चंद्र कोडापे यांचा तसेच शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात यशस्वी कामगिरी करणारे सोमाक्षी गुंडावार, वृद्धी राठी, सुमिरन सहारे, संघवी हेडावू यांचा यावेळी पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

---------------

हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव


 rajesh pande