बीड - पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालयाचा कोनशिला समारंभ व भूमिपूजन सोहळा संपन्न
बीड, 15 ऑगस्ट (हिं.स.)। परळी वैजनाथ येथे ६३४ कोटी रुपये खर्चाच्या पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालयाचा कोनशिला समारंभ व भूमिपूजन सोहळा उपमुख्यमंत्री तथा बीडच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या शुभहस्ते उत्साहात संपन्न झाला. या महाविद्यालयाम
Q


बीड, 15 ऑगस्ट (हिं.स.)। परळी वैजनाथ येथे ६३४ कोटी रुपये खर्चाच्या पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालयाचा कोनशिला समारंभ व भूमिपूजन सोहळा उपमुख्यमंत्री तथा बीडच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या शुभहस्ते उत्साहात संपन्न झाला.

या महाविद्यालयामुळे मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे पशुवैद्यकीय शिक्षण, अत्याधुनिक प्रयोगशाळा, संशोधन केंद्र व सुसज्ज वसतिगृह उपलब्ध होणार असून परिसरातील पशुपालकांनाही आधुनिक पशुवैद्यकीय उपचारांची सुविधा मिळणार आहे.

“केवळ नोकरी मागणारे डॉक्टर नव्हे, तर पेट केअर क्लिनिक, डेअरी सल्लागार, पशुखाद्य निर्मिती अशा क्षेत्रांत रोजगार निर्माण करणारे तरुण उद्योजक घडावेत,” अशी अपेक्षा उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी व्यक्त केली. तसेच चालू शैक्षणिक वर्षातच प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याचे त्यांनी सांगितले. “समृद्ध शेतकरी, सुदृढ जनावर आणि स्वावलंबी मराठवाडा” घडवण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.

यावेळी पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे, माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे, आमदार नमिता मुंदडा, माजी खासदार डॉ. प्रीतम मुंडे, संजय दौंड, बदामराव पंडीत, पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी, नगराध्यक्षा परळी-वैजनाथ, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन पाटील, पशुसंवर्धन विभागाचे सचिव डॉ. एन. रामास्वामी, जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जतीन रहेमान, पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande