महा-पल्स एआय आणि ‘आशा साथी’मुळे कोल्हापूरच्या आरोग्य व्यवस्थेला डिजिटल बळकटी : पालकमंत्री आबिटकर
कोल्हापूर, 15 ऑगस्ट (हिं.स.)। कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) माध्यमातून आरोग्य सेवा अधिक सक्षम, गतिमान आणि नागरिक केंद्री करण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यात ‘महा-पल्स एआय’ हा राज्यातील पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येणार असून, कृत्रिम बुध्दिमत्तेवर आधारित ज
पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय ध्वजारोहण


कोल्हापूर, 15 ऑगस्ट (हिं.स.)। कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) माध्यमातून आरोग्य सेवा अधिक सक्षम, गतिमान आणि नागरिक केंद्री करण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यात ‘महा-पल्स एआय’ हा राज्यातील पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येणार असून, कृत्रिम बुध्दिमत्तेवर आधारित जिल्हा आरोग्य कंमाड सेंटर उभारणारा पथदर्शी (पायलट) जिल्हा ठरणार आहे. या प्रकल्पांतर्गत जिल्ह्यातील 12 तालुक्यातील सर्व शासकीय यंत्रणा, केंद्रे, एकाच डिजिटल व्यासपीठावर जोडली जाणार आहेत, असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले.

भारताच्या 80 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय ध्वजारोहण झाले,

यावेळी बोलताना पालक मंत्री आबिटकर म्हणाले आशा साथी हा जिल्हा परिषद, कोल्हापूरच्या आरोग्य विभागाच्यावतीने आणखी एक महत्त्वाकांक्षी डिजिटल उपक्रम राबविण्यात येत आहे. याव्दारे आशा सेविकांचे काम अधिक सोपे आणि जलद प्रभावी होणार आहे. शासनाने राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सेवा समायोजनाचा ऐतिहासिक व कर्मचारी हिताचा निर्णय १५ हजारांहून अधिक कंत्राटी कर्मचारी नियमित जिल्ह्यातील सुमारे ४५८ आरोग्य कर्मचाऱ्यांना लाभ होणार आहे.

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना (MJPJAY) आणि आयुष्मान भारत जन आरोग्य योजनांच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल अशा जिल्ह्यातील ६ हजार ५०० नागरिकांना दिलासा देण्यात आला असल्याचे सांगून ते म्हणाले, पिंक ओपीडी या उपक्रमांतर्गत आठवड्यातील ठरावीक दिवशी महिलांसाठी विशेष आरोग्य सेवा ग्रामीण भागातील १३ लाखांहून अधिक महिला व मुलींना याचा थेट लाभ होणार आहे. तसेच कोल्हापूर जिल्ह्यात अवयवदान जनजागृती अभियान मोठ्या प्रमाणात राबविण्यात येत आहे. आपण स्वतः अवयवदान नोंदणी केली असल्याचे सांगून सर्व नागरिकांनी या पवित्र कार्यात सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले. शेंडा पार्कमध्ये अमेरिकेच्या 'ह्यूस्टन' शहराच्या धर्तीवर मेडिकल हब उभारण्यात येत असून त्यासाठी ४७३ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. शेंडा पार्कमध्ये ६०० बेडचे सामान्य, २५० बेडचे कॅन्सर आणि २५० बेडचे सुपर स्पेशालिटी सुविधा उपलब्ध होणार आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात 'माझे गाव 'आरोग्य संपन्न गाव' हा एक महत्वाकांक्षी उपक्रम या अभियानांतर्गत प्रत्येक गावाला आरोग्यदृष्ट्या सक्षम, स्वच्छ व रोगमुक्त बनविण्याचा संकल्प आहे.

यावेळी जैन आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी, जिल्हा परिषद अध्यक्षा शिल्पा खोत, खासदार शाहू महाराज छत्रपती, खासदार धनंजय महाडिक, महापौर रुपाराणी निकम, कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड आदी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar


 rajesh pande