एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत; प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केली इच्छा
छत्रपती संभाजीनगर, 15 ऑगस्ट (हिं.स.)। मुख्यमंत्री पदावरून शिवसेनेने पुन्हा एकदा भाजपला डिवचलं आहे. एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत, अशी इच्छा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केली आहे. काही दिवसांपूर्वी खासदार प्रतापराव जाधव यां
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत; प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केली इच्छा


छत्रपती संभाजीनगर, 15 ऑगस्ट (हिं.स.)। मुख्यमंत्री पदावरून शिवसेनेने पुन्हा एकदा भाजपला डिवचलं आहे. एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत, अशी इच्छा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केली आहे. काही दिवसांपूर्वी खासदार प्रतापराव जाधव यांनीही एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री व्हावं, अशी इच्छा व्यक्त केली होती. त्यांच्या या मागणीला आज प्रताप सरनाईक यांनी पाठिंबा दिला आहे. धाराशिव येथे ते बोलत होते

सध्याच्या परिस्थितीत भाजपचं संख्याबळ अधिक असल्याने मुख्यमंत्रीपद भाजपकडे असल्याचंही सरनाईक यांनी स्पष्ट केलं. भविष्यात शिवसेनेचे आमदार आणि खासदार अधिक संख्येने निवडून आल्यास मुख्यमंत्रीपदावर शिवसेना दावा करेल, असंही त्यांनी स्पष्ट केले.त्यामुळे मुख्यमंत्रीपदावरून महायुतीतील धुसफूस पुन्हा एकदा समोर आली आहे. आता प्रताप सरनाईकांच्या या वक्तव्यावर भाजपकडून काय प्रतिक्रिया येते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande