
बीड, 15 ऑगस्ट (हिं.स.)।
भारतीय जनता पक्षाचा केज विधानसभा मतदारसंघाच्या आमदार नमिता मुंदडा यांनी
केज विधानसभेच्या भाग्यविधात्या स्व. डॉ. सौ. विमलताई मुंदडा यांच्या जयंतीनिमित्त चनई येथील त्यांच्या स्मृतीस्थळी भेट देऊन पुष्पहार अर्पण केला आणि त्यांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन केले.
केज विधानसभा मतदारसंघातील जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने कार्यरत राहून विकासाची दूरदृष्टी आणि लोकसेवेची तळमळ त्यांनी आपल्या कार्यातून सिद्ध केली. जनतेशी असलेली त्यांची नाळ, विकासासाठीची त्यांची धडपड आणि सेवाभावी कार्य आजही समाजकारणाच्या वाटचालीत प्रेरणादायी आहे. असे त्या म्हणाल्या
याप्रसंगी नंदकिशोरजी (काकाजी) मुंदडा, श्री. अक्षय मुंदडा यांच्यासह स्व. विमलताईंवर प्रेम करणारे केज विधानसभा मतदारसंघातील मान्यवर व नागरिक उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis