स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी रांगोळीच्या माध्यमातून थोर महापुरुषांची रांगोळी साकारत दिली मानवंदना
अमरावती, 15 ऑगस्ट (हिं.स) अमरावतीत स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर रांगोळी चित्रातून स्वातंत्र्यवीरांना अनोखी मानवंदना अर्पण केली जात आहे. पीपल्स कला मंच, चांदूर रेल्वे आणि शिक्षण विभाग पंचायत समिती भातकुली यांच्या संयुक्त विद्यमाने 11 ते 20 ऑ
स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी रांगोळीच्या माध्यमातून थोर महापुरुषांची रांगोळी साकारत दिली मानवंदना..


अमरावती, 15 ऑगस्ट (हिं.स)

अमरावतीत स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर रांगोळी चित्रातून स्वातंत्र्यवीरांना अनोखी मानवंदना अर्पण केली जात आहे. पीपल्स कला मंच, चांदूर रेल्वे आणि शिक्षण विभाग पंचायत समिती भातकुली यांच्या संयुक्त विद्यमाने 11 ते 20 ऑगस्ट दरम्यान रांगोळी व्यक्तीचित्र प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

जगप्रसिद्ध रांगोळी चित्रकार प्रमोद आर्वी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली 27 कलावंतांनि आज स्वातंत्र्य दीना निमित्य सलग 17 तास महापुरुषांच्या रांगोळी साकारल्या आहे,यामध्ये महात्मा गांधी, भगतसिंग, सुभाषचंद्र बोस आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांसारख्या स्वातंत्र्यवीरांची आकर्षक रांगोळी चित्रे साकारली जात आहेत.

विशेष म्हणजे ही कार्यशाळा पूर्णतः निशुल्क असून, रांगोळी कलेतून रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. 18 ऑगस्ट रोजी या कलाकृतींचे प्रदर्शन आयोजित करण्यात येणार असून, अमरावतीतील कलाप्रेमींना ही अनोखी कला जवळून पाहण्याची संधी मिळणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande