पाकिस्तानच्या नाशाची वेळ जवळ आली असून त्याचे पाच भाग होणार; खा.अनिल बोंडे यांचा हल्लाबोल
अमरावती, 15 ऑगस्ट (हिं.स.) पाकिस्तान तेरे तुकडे होंगे... इन्शाअल्लाह, इन्शाअल्लाह! आणि जय श्रीराम, जय श्रीराम! भाजपचे राज्यसभा खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी पाकिस्तानवर निशाणा साधत थेट इशारा दिला आहे. जेव्हा दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात
पाकिस्तानचे ५ तुकडे होणार.. खा. डॉ. अनिल बोंडे यांचा थेट हल्लाबोल


अमरावती, 15 ऑगस्ट (हिं.स.)

पाकिस्तान तेरे तुकडे होंगे... इन्शाअल्लाह, इन्शाअल्लाह! आणि जय श्रीराम, जय श्रीराम! भाजपचे राज्यसभा खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी पाकिस्तानवर निशाणा साधत थेट इशारा दिला आहे.

जेव्हा दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (JNU) 'भारत तेरे तुकडे होंगे'च्या घोषणा दिल्या जात होत्या, त्याला जोरदार प्रत्युत्तर देत खा. बोंडे यांनी आता पाकिस्तानचे पाच तुकडे होणार असा मोठा दावा केला आहे.

खा. बोंडे म्हणाले की, निरपराध महिलांवर केलेले अत्याचार आणि गोहत्येचा शाप आता पाकिस्तानला भोगावे लागत आहे. याच पापामुळे भूतकाळात पाकिस्तानचे दोन तुकडे होऊन बांगलादेशची निर्मिती झाली, तर बलोचिस्तानने आधीच स्वतःला स्वतंत्र घोषित केले आहे.

पुढे बोलताना बोंडे म्हणाले की, आता पाकिस्तानच्या नाशाची वेळ जवळ आली असून त्याचे पाच भाग होणार आहेत. बलुचिस्तान, पख्तुनिस्तान, सिंध, काश्मीर आणि पंजाब! अमरावतीत खा. बोंडे यांच्या या वक्तव्यामुळे आणि दिलेल्या घोषणांमुळे राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.

-------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande