पाथरी नगरपालिकेतील 243 कोटी रुपयांच्या घोटाळ्याची लवकरच चौकशी -आमदार सईद खान
परभणी, 15 ऑगस्ट (हिं.स.)। पाथरी नगरपालिकेत 243 कोटी रुपयांचा घोटाळा झाला या घोटाळ्याप्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ समिती नियुक्त केली आहे ही समिती लवकरच री ऑडिट करणार आहे. माजी आमदारांनी 35 वर्षात जे घोटाळे केले त्याची चौकशी होणार
अ


परभणी, 15 ऑगस्ट (हिं.स.)।

पाथरी नगरपालिकेत 243 कोटी रुपयांचा घोटाळा झाला या घोटाळ्याप्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ समिती नियुक्त केली आहे ही समिती लवकरच री ऑडिट करणार आहे. माजी आमदारांनी 35 वर्षात जे घोटाळे केले त्याची चौकशी होणार आहे अशी माहिती शिवसेना आमदार सईद खान यांनी पत्रकार परिषदेत दिली.

शिवसेना आमदार सईद खान नगराध्यक्ष आसिफ खान यांच्या उपस्थितीत आज दुपारी झालेल्या पत्रकार परिषदेत माजी आमदारांच्या विरोधात प्रचंड प्रमाणामध्ये गैरव्यवहार झाल्याचे त्यांनी पुरावे सादर केले. गेल्या 35 वर्षात पाथरी नगरपालिकेत मोठा घोटाळे झाला या घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी आपण एकनाथ शिंदे यांच्याकडे केली शिंदे यांनी तात्काळ दखल घेऊन मंत्रालयातील एक समिती नियुक्त केली आहे ही समिती लवकरच पाथरी नगरपालिकेत येऊन याप्रकरणी दखल घेणार आहे गुन्हे दाखल होणार आहेत आणि सगळा पर्दाफाश होणार आहे असे सांगताना शिवसेना आमदार खान म्हणाले खरंतर आमची प्रगती माजी आमदारांना डोळ्यात सलत आहे माझा भाऊ जिल्हा मध्यवर्ती बँकेचा संचालक झाला एक भाऊ नगराध्यक्ष झाला मी स्वतः आमदार झालो त्यामुळे मोठ्या प्रमाणात जळजळ आहे मात्र विकासाच्या कामासाठी आपण काम करणार आहोत गोरगरिबांसाठी काम करणार आहोत सत्तेचा उपयोग जनतेच्या हितासाठी करणार असल्याचे खान यांनी सांगितले. 243कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी चौकशी होणार आहे गुढे दाखल होणार आहेत संबंधिताविरुद्ध कडक कारवाई देखील होणार असल्याची त्यांनी सांगितले खान यांनी अनेक प्रकारचे आरोप केले या पत्रकार परिषदेला नगरसेवक शिवसेनेचे नेते कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande