धाराशिव - छत्रपती शिवाजी महाराज चौकात ४५ मीटर (१५१ फूट) भव्य स्वराज्य ध्वज उद्घाटन
धाराशिव, 15 ऑगस्ट (हिं.स.)। आज धाराशिव मधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात ४५ मीटर (१५१ फूट) भव्य स्वराज्य ध्वज उद्घाटन सोहळ्यास परिवहन मंत्री प्रताप सरनाईक उपस्थित होते. मराठा साम्राज्याचा मानबिंदू असलेला हा स्वराज्य ध्वज फडकवतांना एक अलौकिक ऊर्जा
अ


धाराशिव, 15 ऑगस्ट (हिं.स.)।

आज धाराशिव मधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात ४५ मीटर (१५१ फूट) भव्य स्वराज्य ध्वज उद्घाटन सोहळ्यास परिवहन मंत्री प्रताप सरनाईक उपस्थित होते.

मराठा साम्राज्याचा मानबिंदू असलेला हा स्वराज्य ध्वज फडकवतांना एक अलौकिक ऊर्जा जाणवली आणि उर अभिमानाने भरून आले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मरण करत त्यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन केले.

धाराशिव शहरात भव्य भगवा ध्वज उभारण्यात यावा, ही मराठा समाजाची प्रमुख आणि सातत्याने मांडण्यात आलेली मागणी होती. या मागणीची दखल घेत धाराशिव जिल्हा नियोजन समितीच्या (DPDC) ऑगस्ट २०२५ मधील नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत तब्बल ९० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. या कामासाठी जातीने लक्ष दिले व या कामाला विशेष प्राधान्य देत हा महत्वाकांक्षी प्रकल्प जलद गतीने पूर्ण व्हावा यासाठी प्रयत्न केले.

भगवा ध्वज हा केवळ एक झेंडा नसून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याचा प्रतीक आहे. लाखो मराठ्यांसाठी प्रेरणा आणि बळ देणारा ऊर्जा स्रोत आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौकात डौलाने फडकणारा हा स्वराज्य ध्वज शहराच्या सौंदर्यात आणखी भर घालणार असून या ठिकाणाला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्व प्राप्त होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव असलेल्या चौकात उभारलेला हा भव्य भगवा ध्वज नागरिकांच्या अभिमानाचा विषय ठरणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande