हरित धाराशिव अभियान २.० या अतिशय स्तुत्य उपक्रमाचा शुभारंभ
अभिनेते सयाजी शिंदे यांची उपस्थिती धाराशिव, 15 ऑगस्ट (हिं.स.)। आज स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून हरित धाराशिव अभियान २.० या अतिशय स्तुत्य उपक्रमाचा शुभारंभ ''सह्याद्री देवराई'' हरीत चळवळीचे प्रमुख अभिनेते सयाजी शिंदे यांच्या उपस्थितीत केला. या
अ


अभिनेते सयाजी शिंदे यांची उपस्थिती

धाराशिव, 15 ऑगस्ट (हिं.स.)।

आज स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून हरित धाराशिव अभियान २.० या अतिशय स्तुत्य उपक्रमाचा शुभारंभ 'सह्याद्री देवराई' हरीत चळवळीचे प्रमुख अभिनेते सयाजी शिंदे यांच्या उपस्थितीत केला. या अभियानांतर्गत धाराशिवमध्ये १० लाखांहून अधिक वृक्ष लागवड करून त्यांच्या संगोपनाचा संकल्प करण्यात आला. यावेळी पालकमंत्री प्रताप सरनाईक खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी दिलेला “एक पेड माँ के नाम” हा संदेश केवळ वृक्षारोपणाचा कार्यक्रम नाही, तर आई, माती आणि पर्यावरण यांच्याशी असलेले आपले नाते अधिक घट्ट करणारी भावनिक चळवळ आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या “हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र” या संकल्पनेतून ही चळवळ आता लोकचळवळ बनत आहे.

याच संकल्पनेला धाराशिव जिल्ह्याने आपल्या कर्तृत्वाची जोड दिली आहे. सन २०२५ मध्ये “हरित धाराशिव अभियान १.०” अंतर्गत एकाच दिवशी १९ जुलै रोजी तब्बल १७ लाख १ हजार ८१५ वृक्षांचे रोपण करून धाराशिवने जागतिक विक्रम प्रस्थापित केला. या विक्रमाची नोंद वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स, लंडन आणि एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये झाली. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, या अभियानात लावलेल्या रोपांपैकी ८६.९७ टक्के रोपे जिवंत राहिली, ही आपल्या सामूहिक प्रयत्नांची खरी पावती आहे.

“हरित धाराशिव अभियान २.०”च्या माध्यमातून आपण आणखी मोठे स्वप्न पाहिले आहे—केवळ १२ तासांत १० लाखांहून अधिक वृक्षारोपण करून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नवा विक्रम करण्याचा संकल्प! यासाठी जिल्ह्यातील ८ ठिकाणी तब्बल ८३.२६ एकर क्षेत्रावर मियावाकी पद्धतीने घनवन विकसित केले जाणार आहे आणि तब्बल १० लाख ११ हजार स्थानिक प्रजातींच्या रोपांची लागवड करण्यात येणार आहे.

या अभियानाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर. प्रत्येक रोपाला स्वतंत्र QR कोड देण्यात येणार आहे. त्याची डिजिटल नोंद होणार आहे. फोटोग्राफी, व्हिडिओ रेकॉर्डिंग, ड्रोन शूटिंग आणि हस्तलिखित लॉगबुकच्या माध्यमातून प्रत्येक रोपाची अचूक नोंद ठेवली जाणार आहे.

पर्यावरण रक्षण ही केवळ एक जबाबदारी नाही तर आपल्या पुढील पिढीप्रती असलेले कर्तव्य आहे. त्यामुळे प्रत्येकाने किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प करूया.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande