
छत्रपती संभाजीनगर, 15 ऑगस्ट (हिं.स.) आज ८० व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त धाराशिव जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून प्रताप सरनाईक यांना ध्वजारोहण करण्याचा मान मिळाला, हा माझ्यासाठी अभिमानाचा गौरवाचा क्षण आहे, असे मंत्री सरनाईक म्हणाले.
ते पुढे म्हणाले, स्वातंत्र्य लढ्यात बलिदान दिलेल्या वीर शहीदांचे, स्वातंत्र्य सैनिकांचे स्मरण करून त्यांना मानवंदना दिली. सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आपल्या देशातील विविधतेतील एकता जपत देशाला एकसंघ ठेवून स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही मूल्ये अबाधित राखूया.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis