
धाराशिव, 15 ऑगस्ट (हिं.स.)।
शिवसेना शिंदे गटाची जिल्हा कार्यकारणी लवकरच जाहीर होण्याचे संकेत पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांनी दिले आहेत. जुने व नवे पदाधिकारी अशी मोट बांधणार असुन पुन्हा एकदा धाराशिव जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला बनवू, असा संकल्प पालकमंत्री सरनाईक यांनी बोलून दाखवला. खासदार ओमराजे निंबाळकर यांनी उबाठा गटातुन शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर धाराशिवची जिल्हा कार्यकारणी बरखास्त केली होती.
जुना नवीन वाद निर्माण न करता शिवसेनेची एक चांगली मोट धाराशिव जिल्ह्यात बांधली जाईल आणि त्यामाध्यमातून नवीन कार्यकारिणी घोषित करण्यात येईल. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार श्रीकांत शिंदे हे धाराशिव जिल्ह्यातील प्रत्येक गोष्टीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.निश्चितपपणे चांगल्या प्रकारची कार्यकारिणी बनवून परत एकदा धाराशिव जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला कसा होईल यासाठी सगळे जण प्रयत्न करू असे पालकमंत्री म्हणाले.
राणाजगजीतसिंह पाटील समर्थक असा आरोप असलेल्या नेत्यांची संघटनात्मक पदावर 'घुसखोरी' थांबविणे हे एक आव्हान असणार आहे. सत्तेत विकासाच्या मुद्यावर काही पदाधिकारी यांनी ओमराजे पर्यायाने शिवसेना उबाठा गटाची साथ सोडून भाजपात प्रवेश केला होता, तेथील नेतृत्वाच्या कार्यपद्धतीला कंटाळलेले काही मुख्य पदाधिकारी पुन्हा ओमराजे यांच्यासोबत येणार आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis