तुळजाभवानी मंदिरात सुरक्षा कर्मचाऱ्याचा प्रामाणिकपणा; १५७५८ रुपयांचे पॉकेट भाविक महिलेला परत
छत्रपती संभाजीनगर, 15 ऑगस्ट (हिं.स.)। श्री तुळजाभवानी मंदिर परिसरात सुरक्षा रक्षक युवराज फडके यांच्या प्रामाणिकपणाचे दर्शन घडले. १५ ऑगस्ट रोजी ड्युटीवर असताना त्यांना एक पॉकेट आढळून आले. त्यांनी ते तत्काळ मंदिर संस्थानच्या कंट्रोल रूममध्ये जमा केल
अ


छत्रपती संभाजीनगर, 15 ऑगस्ट (हिं.स.)।

श्री तुळजाभवानी मंदिर परिसरात सुरक्षा रक्षक युवराज फडके यांच्या प्रामाणिकपणाचे दर्शन घडले. १५ ऑगस्ट रोजी ड्युटीवर असताना त्यांना एक पॉकेट आढळून आले. त्यांनी ते तत्काळ मंदिर संस्थानच्या कंट्रोल रूममध्ये जमा केले.

पडताळणीत पॉकेटमध्ये १५ हजार ७५८ रुपये रोख, ATM कार्ड आणि महत्त्वाची कागदपत्रे आढळली. मंदिर प्रशासनाने हैदराबाद येथील संबंधित भाविक महिलेचा शोध घेऊन पडताळणीनंतर सर्व साहित्य सुरक्षितपणे परत केले.

पॉकेट परत मिळाल्याबद्दल महिलेने मंदिर संस्थान, सुरक्षा विभाग आणि सुरक्षा रक्षक युवराज फडके यांचे आभार मानले. त्यांच्या प्रामाणिकपणा व कर्तव्यनिष्ठेचे कौतुक करण्यात आले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande