
बीड, 15 ऑगस्ट (हिं.स.)।
बीड तालुक्यातील तांदळवाडी येथील गैरव्यवहार प्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नितीन सोनवणे यांनी 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्यांचे धरणे आंदोलन सुरू आहे.
सामाजिक चळवळीतील राज्य प्रवक्ता तथा जिल्हाध्यक्ष ऑल इंडिया पॅंथर सेना बीड नितिनजी सोनावणे यांच्या नेतृत्वाखाली आज दि.१५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बीड तालुक्यातील
तांदळवाडी घाट येथील महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी (MREGS) योजनेअंतर्गत मातोश्री ग्रामीण ग्राम समृद्धी पाणंद रस्ते खडीकरण रस्त्यावरील ओवर लॅम्पिंग बोगस काम व गैरव्यवहार बाबत दोषींवर कारवाई करण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis