नाशिक - छत्रपती विद्यालयात स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात टवाळखोरांची दगडफेक
नाशिक, 15 ऑगस्ट (हिं.स.)। - शहरातील सातपूर परिसरामध्ये असलेल्या छत्रपती शिवाजी विद्यालयामध्ये स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम सुरू असताना टवाळखोरांनी दगडफेक करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला तत्काळ पोलिसांनी या ठिकाणी दाखल होत परिस्थिती वरती न
Stone pelting by protesters


नाशिक, 15 ऑगस्ट (हिं.स.)।

- शहरातील सातपूर परिसरामध्ये असलेल्या छत्रपती शिवाजी विद्यालयामध्ये स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम सुरू असताना टवाळखोरांनी दगडफेक करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला तत्काळ पोलिसांनी या ठिकाणी दाखल होत परिस्थिती वरती नियंत्रण मिळवले

नाशिक शहरातील सातपुर परिसरामध्ये असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज विद्यालयामध्ये ८० वा स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम विद्यार्थी व शिक्षक तसेच पालकांच्या उपस्थितीमध्ये सुरू झाला होता हा कार्यक्रम शेवटच्या टप्प्यामध्ये असताना अचानक या परिसरामध्ये काही टवाळकर मुलांनी येऊन दगडफेक केली यामुळे काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झालेलं होतं तत्काळ या ठिकाणी पोलिसांना बोलविण्यात आले पोलिसांनी परिसरात टवाळखोराचा शोध घेत परिस्थिती वरती नियंत्रण मिळवले. याबाबत संस्थेचे सचिव रामनाथ शिंदे यांनी सांगितले की संबंधित दगडफेक करणाऱ्या व्यक्ती या शाळेशी संबंधित नाही त्यांनी या ठिकाणी दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने हे कृत्य केल्याचे समोर येत असून त्यांच्यावरती कठोर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI


 rajesh pande