नांदेड - माय भारत युवा केंद्र आणि मित्र संस्थांच्या संयुक्त विद्यमाने ‘स्वच्छता पंधरवडा’
नांदेड, 15 ऑगस्ट (हिं.स.)। युवा कार्यक्रम एवं खेल मंत्रालय, भारत सरकार अंतर्गत येणाऱ्या माय भारत युवा केंद्र यांच्या पुढाकाराने व कै. सोपानराव तदलापूरकर क्रीडा मंडळ आणि श्री रामचंद्र युवा मंडळ, नांदेड यांच्या सहकार्याने ‘स्वच्छता पंधरवडा’ अत्यंत
अ


नांदेड, 15 ऑगस्ट (हिं.स.)।

युवा कार्यक्रम एवं खेल मंत्रालय, भारत सरकार अंतर्गत येणाऱ्या माय भारत युवा केंद्र यांच्या पुढाकाराने व कै. सोपानराव तदलापूरकर क्रीडा मंडळ आणि श्री रामचंद्र युवा मंडळ, नांदेड यांच्या सहकार्याने ‘स्वच्छता पंधरवडा’ अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला.

देशभरात 'स्वच्छ भारत, स्वस्थ भारत, समृद्ध भारत' या उद्देशाला समोर ठेवून घेतलेल्या या पंधरवडयात विविध स्पर्धा आणि जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

राबविण्यात आलेले प्रमुख उपक्रम:

स्वच्छता शपथ: कार्यक्रमाची सुरुवात करताना सर्व स्वयंसेवकांनी व नागरिकांसोबत स्वच्छतेची प्रतिज्ञा व शपथ घेतली.

स्वच्छता पोस्टर प्रदर्शन: युवकांनी स्वतः तयार केलेल्या आकर्षक आणि संदेशपर पोस्टर्सचे खास प्रदर्शन भरवण्यात आले.

स्वच्छता रॅली : गावात जनजागृती निर्माण करण्यासाठी भव्य स्वच्छता रॅली काढण्यात आली, ज्यामध्ये नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.

घरोघर जाऊन स्वच्छता संदेश: स्वयंसेवकांनी घरोघरी जाऊन नागरिकांना ओला-सुका कचरा व आरोग्याबाबत मार्गदर्शन करत स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले.

सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता : गावातील विविध सार्वजनिक स्थळे, परिसर व चौक श्रमदानातून पूर्णपणे स्वच्छ करण्यात आले.

मान्यवरांचे मार्गदर्शन व सहभाग:

हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी युवा मंडळाच्या अध्यक्षा साधना गायकवाड, सचिव नंदनी तदलापूरकर, तसेच सोहन तदलापूरकर, ऋषिकेश तदलापूरकर आणि यश तदलापूरकर यांनी विशेष व अथक परिश्रम घेतले. या उपक्रमाला संस्थाध्यक्ष कैलाश गायकवाड, माहेश्वरी गायकवाड आणि सांस्कृतिक कार्यप्रमुख शिवशंकर मूळे यांचे मार्गदर्शन लाभले.

आयोजक: माय भारत युवा केंद्र, नांदेड.

सहकार्य: कै. सोपानराव तदलापूरकर क्रीडा मंडळ आणि श्री रामचंद्र युवा मंडळ.

00000

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande