रस्त्यावर सापडलेली मौल्यवान पर्स पोलिसांच्या प्रामाणिकपणामुळे परत
बीड, 15 ऑगस्ट (हिं.स.)। १५ ऑगस्टच्या दिवशी पोलिसांच्या माणुसकीचे दर्शन १५ ऑगस्टच्या स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर बीड शहरात पोलिसांच्या प्रामाणिकपणाचे आणि माणुसकीचे जिवंत उदाहरण पाहायला मिळाले. येथील गांधी चौक परिसरात भगवान विद्यालयाच्या शिक्
Q


बीड, 15 ऑगस्ट (हिं.स.)।

१५ ऑगस्टच्या दिवशी पोलिसांच्या माणुसकीचे दर्शन

१५ ऑगस्टच्या स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर बीड शहरात पोलिसांच्या प्रामाणिकपणाचे आणि माणुसकीचे जिवंत उदाहरण पाहायला मिळाले. येथील गांधी चौक परिसरात भगवान विद्यालयाच्या शिक्षिका सौ. सानप मॅडम यांच्या स्कुटीला अडकवलेली पर्स बेल्ट तुटल्याने रस्त्यावर पडली. मात्र, शाळेत ध्वजारोहणासाठी जाण्याच्या घाईत पर्स पडल्याचे त्यांच्या लक्षात आले नाही.

या पर्समध्ये मौल्यवान दागिने, मोबाईल, महत्त्वाची कागदपत्रे, एटीएम कार्ड तसेच इतर आवश्यक साहित्य होते. शाळेत पोहोचल्यानंतर पर्स गायब असल्याचे लक्षात येताच सानप मॅडम यांनी तातडीने पुन्हा गांधी चौक ते शाळेच्या मार्गावर शोधाशोध सुरू केली. मात्र, पर्सचा कुठेही मागमूस लागला नाही.

दरम्यान, पोलीस मुख्यालयातील प्रामाणिक पोलीस अंमलदार श्री. गुंजाळ यांना रस्त्यावर एक बेवारस पर्स आढळली. पर्समध्ये मौल्यवान वस्तू असल्याचे लक्षात येताच त्यांनी ती ताब्यात घेतली आणि कोणताही विलंब न करता थेट पोलीस मुख्यालय गाठले. तेथे मुख्यालयाचे इंचार्ज श्री. पांडुरंग दलाई यांना घडलेली संपूर्ण घटना सांगितली.

याचदरम्यान सानप मॅडम यांनी एका फळ विक्रेत्याचा मोबाईल घेऊन स्वतःच्या नंबरवर फोन केला. तो फोन पर्समध्ये असलेल्या मोबाईलवर आला. मोबाईलची रिंग ऐकून पोलीस अंमलदार गुंजाळ यांनी फोन उचलला आणि सानप मॅडम यांना त्यांची पर्स पोलीस मुख्यालयात सुरक्षित असल्याची माहिती दिली.

त्यानंतर सानप मॅडम यांना पोलीस मुख्यालयात बोलावून पांडुरंग दलाई यांच्या उपस्थितीत त्यांच्या समक्ष पर्स उघडण्यात आली. पर्समधील सर्व साहित्य तपासून ते जसेच्या तसे सानप मॅडम यांच्या स्वाधीन करण्यात आले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande