
बीड, 15 ऑगस्ट (हिं.स.)।
जिल्हा व सत्र न्यायालय, अंबाजोगाई येथे आमदार नमिता मुंदडा यांच्या उपस्थितीत तालुका विधी सेवा समिती, अंबाजोगाई व वकील संघ, अंबाजोगाई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘वॉकथॉन-२०२६’ कार्यक्रम संपन्न झाला. मुलांचे हक्क, त्यांचे संरक्षण आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी जनजागृती हा या वॉकथॉनचा मुख्य उद्देश होता.
मुलांना सुरक्षित, सन्मानपूर्वक आणि हक्कपूर्ण बालपण मिळणे ही आपल्या सर्वांचीच सामूहिक जबाबदारी आहे. आज त्यांच्या हक्कांसाठी उचललेले प्रत्येक पाऊल त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.
या वॉकथॉनमध्ये वकील बांधव, पोलिस अधिकारी, शालेय विद्यार्थी आणि शहरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis