जपानमध्ये रिश्टर स्केलवर 5.9 तीव्रतेचा भूकंप, 20 हून अधिक जखमी
टोकियो, 23 ऑगस्ट (हिं.स.)।जपानची राजधानी टोकियो आणि पूर्वेकडील भागात रविवारी पहाटे जोरदार भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 5.9 इतकी नोंदवण्यात आली. या भूकंपामुळे 20 हून अधिक जण जखमी झाल्याची माहिती आहे. त्यापैकी बहुतांश जणा
पेरूमध्ये रिश्टर स्केलवर ६.७ तीव्रतेचा भूकंप


टोकियो, 23 ऑगस्ट (हिं.स.)।जपानची राजधानी टोकियो आणि पूर्वेकडील भागात रविवारी पहाटे जोरदार भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 5.9 इतकी नोंदवण्यात आली. या भूकंपामुळे 20 हून अधिक जण जखमी झाल्याची माहिती आहे. त्यापैकी बहुतांश जणांना किरकोळ दुखापत झाली आहे. भूकंपानंतर जपानमध्ये सुनामीचा कोणताही इशारा जारी करण्यात आलेला नाही.

जपान हवामानशास्त्र संस्थेच्या (जेएमए) माहितीनुसार, हा भूकंप दक्षिण इबाराकी प्रांतात जमिनीखाली सुमारे 70 किलोमीटर खोलीवर झाला. अमेरिकेच्या भूगर्भीय सर्वेक्षण संस्थेने (युएसजीएस) भूकंपाची प्राथमिक तीव्रता 5.8 असल्याचे सांगितले. हा परिसर जपानमधील भूकंपप्रवण भागांपैकी एक आहे.

ईस्ट जपान रेल्वे कंपनीच्या माहितीनुसार, भूकंपामुळे टोकियो आणि नारिता विमानतळादरम्यान धावणाऱ्या एक्स्प्रेस गाड्या तसेच ईशान्येकडील भागातील काही लोकल गाड्यांच्या वाहतुकीला विलंब झाला. मात्र, शिंकानसेन बुलेट ट्रेनची सेवा सुरळीत सुरू होती. भूकंपानंतर प्रशासनाने तातडीने उपाययोजना सुरू केल्या. पंतप्रधान साने ताकाइची यांनी सरकारने मदत आणि बचावकार्याच्या समन्वयासाठी एक पथक स्थापन केल्याचे सांगितले. भूकंपामुळे काही ठिकाणी पायाभूत सुविधांचेही नुकसान झाले आहे.

टोकियोच्या कोटो वॉर्डमध्ये भूमिगत पाण्याची पाइपलाइन फुटल्याने रस्त्याचा काही भाग पाण्याखाली गेला. दुरुस्तीचे काम करून पाण्याची गळती थांबवण्यात आली. दरम्यान, टोकियोतील सुमारे 460 घरांचा वीजपुरवठाही खंडित झाला होता. मात्र, टेपको पॉवर ग्रिडच्या माहितीनुसार, रविवारी सकाळपर्यंत वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला.

विशेष म्हणजे, हा भूकंप जपानच्या दक्षिणेकडील प्रमुख बेट क्यूशूच्या कुमामोटो भागात 7.1 तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप झाल्यानंतर काही आठवड्यांनी झाला आहे. त्या भूकंपात 38 जणांचा मृत्यू, 364 जण जखमी, तर 1,500 हून अधिक इमारतींचे नुकसान झाले होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande