शाळांतील जंक फूडवर नियंत्रणासाठी १८४७ मुख्याध्यापकांची कार्यशाळा
अकोला, 25 ऑगस्ट (हिं.स.)। विद्यार्थ्यांचे आरोग्य, पोषण आणि शाळांमधील अन्नाची सुरक्षितता याबाबत जनजागृती करण्यासाठी अन्न व औषध प्रशासन, अकोला आणि जिल्हा परिषद शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मुख्याध्यापकांची विशेष कार्यशाळा घेण्यात आली. जिल्ह
Photo


अकोला, 25 ऑगस्ट (हिं.स.)। विद्यार्थ्यांचे आरोग्य, पोषण आणि शाळांमधील अन्नाची सुरक्षितता याबाबत जनजागृती करण्यासाठी अन्न व औषध प्रशासन, अकोला आणि जिल्हा परिषद शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मुख्याध्यापकांची विशेष कार्यशाळा घेण्यात आली. जिल्ह्यातील विविध शाळांमधील तब्बल १ हजार ८४७ मुख्याध्यापकांनी या कार्यशाळेत सहभाग घेतला.

अन्न व औषध प्रशासन (FDA) अकोला कार्यालयाच्या मार्गदर्शनाखाली आयोजित कार्यशाळेत HFSS (High Fat, High Sugar, High Salt) म्हणजेच जास्त चरबी, साखर व मीठ असलेल्या अयोग्य आहाराचे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर होणारे परिणाम स्पष्ट करण्यात आले. चिप्स, कँडी, कोल्ड ड्रिंक्स, बेकरी पदार्थ आणि तळलेले पदार्थ यांचा अतिरेक लठ्ठपणा, मधुमेह तसेच एकाग्रतेशी संबंधित समस्या निर्माण करू शकतो, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.शाळेच्या परिसरापासून ५० मीटरच्या आत कोणत्याही प्रकारचे जंक फूड व HFSS पदार्थ विक्री अथवा जाहिरात करण्यास FSSAIच्या नियमानुसार मनाई असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

‘ईट राइट स्कूल’ उपक्रमांतर्गत शाळांमध्ये मध्यान्ह भोजनाची स्वच्छता राखणे, विद्यार्थ्यांच्या डब्यात ताजी फळे, उकडलेली कडधान्ये व पौष्टिक आहाराचा समावेश करण्यासाठी पालकांमध्ये जनजागृती करण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच शालेय कॅन्टीन चालकांनी अन्न सुरक्षा नियमांचे पालन करून आवश्यक परवाना व नोंदणी पूर्ण करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.

कार्यशाळेला अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त दे. गो. वीर, अन्न सुरक्षा अधिकारी , प्र. नि. काळे, र. व्दा. साळवेकर व कि. ह. बोऱ्हाडे, तसेच जिल्हा परिषद शिक्षण विभागाचे गटशिक्षण अधिकारी उपस्थित होते. विद्यार्थ्यांमध्ये निरोगी आहाराची संस्कृती रुजवून सुदृढ पिढी घडविण्यासाठी शाळांनी सक्रिय भूमिका घ्यावी, असे आवाहन करण्यात आले.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande