लातूर जिल्ह्यात २८ ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाची स्थानिक सुट्टी
शासकीय कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था आणि खासगी शैक्षणिक संस्थांना सुट्टी लागू लातूर, २५ ऑगस्ट : रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर लातूर जिल्ह्यात शुक्रवार, २८ ऑगस्ट २०२६ रोजी स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जिल्ह्यासाठी सन २०२६ मधील तीन स्था
सार्वजनिक सुट्टी


शासकीय कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था आणि खासगी शैक्षणिक संस्थांना सुट्टी लागू

लातूर, २५ ऑगस्ट : रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर लातूर जिल्ह्यात शुक्रवार, २८ ऑगस्ट २०२६ रोजी स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जिल्ह्यासाठी सन २०२६ मधील तीन स्थानिक सुट्ट्यांची अधिसूचना जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत ५ जानेवारी २०२६ रोजी जाहीर करण्यात आली होती. त्यानुसार रक्षाबंधनानिमित्त ही स्थानिक सुट्टी राहणार आहे.

लातूर जिल्ह्यातील उच्च न्यायालयाच्या अधिकार कक्षेतील कार्यालये, केंद्रीय कार्यालये, केंद्रीय प्रशासनातील कार्यालये तसेच बँकांच्या कक्षेतील कार्यालये वगळता इतर कार्यालयांना ही स्थानिक सुट्टी लागू राहणार आहे.

जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालये, जिल्हा परिषदेच्या कक्षेतील कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्थांची कार्यालये, कोषागारे, महामंडळांची कार्यालये तसेच इतर सर्व खासगी शैक्षणिक संस्थांना २८ ऑगस्ट रोजीची स्थानिक सुट्टी लागू राहील.

रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील संबंधित कार्यालये आणि संस्थांनी या स्थानिक सुट्टीची नोंद घेऊन त्यानुसार नियोजन करावे, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

-------------------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande