वाघी जिल्हा परिषद शाळेतील ७०७ विद्यार्थ्यांना १४ कोटींचे अपघाती विमा कवच
नांदेड, २५ ऑगस्ट (हिं.स.) : नांदेड मध्यवर्ती बँकेच्या संचालिका प्रणिता देवरे चिखलीकर यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधीलकी जपत एक कौतुकास्पद उपक्रम राबविण्यात आला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून भाजपा युवा मोर्चाचे प्र
अ


नांदेड, २५ ऑगस्ट (हिं.स.) : नांदेड मध्यवर्ती बँकेच्या संचालिका प्रणिता देवरे चिखलीकर यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधीलकी जपत एक कौतुकास्पद उपक्रम राबविण्यात आला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश सचिव अनिल पाटील बोरगावकर व त्यांच्या सहकाऱ्यांच्या वतीने जिल्हा परिषद शाळा, वाघी येथील ७०७ विद्यार्थ्यांना प्रत्येकी ₹२ लाखांचे अपघाती विमा कवच देण्यात आले.

या विमा कवचाची एकूण रक्कम ₹१४ कोटी १४ लाख इतकी आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अपघाताच्या प्रसंगी आर्थिक सुरक्षा मिळावी, या उद्देशाने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

महाराष्ट्रासाठी दिशादर्शक ठरणाऱ्या या उपक्रमाच्या धर्तीवर राज्यातील इतर जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांनाही अशाच प्रकारचे सुरक्षा कवच मिळावे, यासाठी राज्य सरकारकडे मागणी करण्यात येणार असल्याचा मानस यावेळी व्यक्त करण्यात आला.

या कार्यक्रमास आमदार बालाजीराव कल्याणकर, आमदार आनंदराव बोंढारकर, माजी आमदार मोहनराव हंबर्डे, माजी जि.प. सभापती प्रवीण पाटील चिखलीकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष शिवराज पाटील होटाळकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गंगाधर बडुरे, जिल्हाप्रमुख विनय गिरडे पाटील, जिल्हा बँक संचालिका संगीता डक, विठ्ठल पाटील डक, अमोल कदम, मुख्याध्यापक आर. बी. देवकत्ते यांच्यासह अनेक मान्यवर, नागरिक, पालक, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

------------------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande