प्रा. गोविंद पवार यांना अर्थशास्त्र विषयात पीएच.डी. पदवी
परभणी, 25 ऑगस्ट (हिं.स.)। येथील शारदा महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. रमेश भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली मूळजी जेठा महाविद्यालय, जळगाव येथील अर्थशास्त्राचे प्राध्यापक प्रा. गोविंद पवार यांनी अर्थशास्त्र विषयात पीएच.डी. पदवी संप
प्रा. गोविंद पवार यांना अर्थशास्त्र विषयात पीएच.डी. पदवी


परभणी, 25 ऑगस्ट (हिं.स.)।

येथील शारदा महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. रमेश भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली मूळजी जेठा महाविद्यालय, जळगाव येथील अर्थशास्त्राचे प्राध्यापक प्रा. गोविंद पवार यांनी अर्थशास्त्र विषयात पीएच.डी. पदवी संपादन केली आहे. त्यांच्या या यशाबद्दल शारदा महाविद्यालयाच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले. प्रा. गोविंद पवार यांनी ‘बंजारा समाजाचे आर्थिक आणि सामाजिक अध्ययन : विशेष संदर्भ जळगाव जिल्हा’ या विषयावर संशोधन केले. सन 2009-10 ते 2019-20 या कालावधीचा त्यांच्या संशोधनात अभ्यास करण्यात आला. बंजारा समाजाची आर्थिक व सामाजिक परिस्थिती, त्यातील बदल तसेच विविध सामाजिक व आर्थिक घटकांचा अभ्यास त्यांच्या संशोधनातून करण्यात आला आहे.

प्रा. गोविंद पवार यांनी पीएच.डी. पदवी प्राप्त केल्याबद्दल शारदा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बबन पवार, संशोधन मार्गदर्शक प्रा. डॉ. रमेश भालेराव, प्रा. डॉ. रत्नाकर कांबळे तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचार्यांनी त्यांचे अभिनंदन केले. त्यांच्या पुढील शैक्षणिक व संशोधन कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande