
यवतमाळ, 25 ऑगस्ट (हिं.स.) | यवतमाळ जिल्ह्यातील खासगी रुग्णालयांनी सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक पावले उचलण्याचा प्रयत्न केला. आवश्यकतेनुसार अग्नीक्षमण यंत्र लावण्यात आले आहे. मात्र, मुदत संपल्यानंतर केवळ तारीख बदलल्याचे प्रकार केल्या जात आहे. याकडे रुग्णालय प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. तसेच नियमित ‘ऑडिट’ची टाच खासगी रुग्णालयावरही पडणे आवश्यक आहे. अमरावती येथे घडलेल्या घटनेने रुग्णालयातील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, सरकारी तसेच खासगी रुग्णालयाने आवश्यक उपाययोजना करणे आवश्यक आहे. जवळपास सर्वच रुग्णालयात उपाययोजना केल्या जात असल्याच्या वावड्या उठविल्या जातात. परंतु, घटना घडल्यानंतर त्या उपाययोजना तोकड्या स्वरूपाच्या पडत असल्याचे बऱ्याचवेळा समोर आले आहे. आताही जिल्ह्यातील बहुतांश बाल रुग्णालयात अत्यावश्यक कक्षाची निर्मिती केली आहे. साधारणतः दुसऱ्या किंवा तिसऱ्या मजल्यावर नवजात शिशू विभाग तयार करण्यात आलेले आहेत. या ठिकाणी जाताना पायऱ्या आणि लिफ्टची व्यवस्था रुग्णालय प्रशासनाने केली आहे.
परंतु, रुग्णालयात एखादी अनुचित घटना घडल्यास तातडीने मदत कार्य पोचविताना अनेक अडचणी येतात. अशा अडचणी सोडविण्याकडे रुग्णालय प्रशासन लक्ष देत नाही. आग लागल्यानंतर फायर आलार्म तसेच अग्नीक्षमण यंत्र बसविण्यात येतात. परंतु, अग्नीक्षमण यंत्राची मुदत संपल्यानंतर तो नव्याने भरून आणण्याऐवजी केवळ तारीख बदलविण्यात येण्याचा प्रकार सर्रास केल्या जात आहे. यावरून खासगी रुग्णालयसुद्धा रुग्ण आणि नातेवाईकांबाबत बेपर्वाही करीत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे प्रशासनाने ही बाब गांभीर्याने घेऊन जिल्ह्यातील संपूर्ण खासगी रुग्णालयाचे ऑडिट करावे आणि अत्यावश्यक उपाय योजना करण्याबाबत स्पष्ट सूचना देणे आवश्यक आहे. दिलेल्या सूचनांच्या अनुषंगाने अंमलबजावणी न करणार्!यांवर कायदेशीर कारवाई प्रस्तावित करणे गरजेचे आहे.
खासगी रुग्णालयावर ‘ऑडिट’ची टाच गरजेची
अनुभव नव्हे, शिक्षणाला महत्व बहुतांश खासगी रुग्णालयात ‘एएनएम’ तसेच ‘जीएनएम’, अशी शैक्षणिक आहर्ता धारकांना प्राधान्य देण्यात येते. तर मुबलक प्रमाणात कर्मचारी कार्यरत राहतात. परंतु, अनुभावाकडे दुर्लक्ष केल्या जाते. परिणामी, उपचार, देखभाल करताना अनेक रुग्णांना फटका बसण्याची शक्यता राहते.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी