लोणी गावात दारूबंदीसाठी महिलांची कारवाईची मागणी
यवतमाळ, 25 ऑगस्ट (हिं.स.) तालुक्यातील लोणी गावात दारूविक्री आणि दारू सेवनामुळे सामाजिक वातावरण बिघडत असून, अनेक कुटुंबांना आर्थिक व कौटुंबिक त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप करीत गावातील महिलांनी आता दारूबंदीचा एल्गार पुकारला आहे. उपसरपंच अमोल पं
लोणी गावात दारूबंदीसाठी महिलांची कारवाईची मागणी


यवतमाळ, 25 ऑगस्ट (हिं.स.) तालुक्यातील लोणी गावात दारूविक्री आणि दारू सेवनामुळे सामाजिक वातावरण बिघडत असून, अनेक कुटुंबांना आर्थिक व कौटुंबिक त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप करीत गावातील महिलांनी आता दारूबंदीचा एल्गार पुकारला आहे. उपसरपंच अमोल पंडितराव वांगे यांच्या नेतृत्वाखाली महिला व ग्रामस्थांनी सोमवारी आर्णी पोलीस ठाणे गाठून सहाय्यक पोलीस निरीक्षक विष्णू पांडे यांना दारूबंदीच्या मागणीचे सामूहिक निवेदन दिले.

गावातील दारू विक्रीमुळे अनेक कुटुंबांमध्ये वादाचे प्रसंग निर्माण होत असून, दारूच्या व्यसनांमुळे कुटुंबांच्या आर्थिक परिस्थितीवरही गंभीर परिणाम होत असल्याचे महिलांनी निवेदनात नमूद केले आहे. दारूच्या व्यसनांमुळे महिला व मुलांना मानसिक त्रास सहन करावा लागत असून, त्याचा परिणाम गावातील सामाजिक शांतता आणि वातावरणावर होत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

दारूबंदीचा सामूहिक निर्णय दारू विक्रीमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांना आळा घालण्यासाठी गावातील महिलांनी एकत्र येत दारूविक्री बंद करण्याचा ठाम निर्णय घेतला आहे. याच मागणीसाठी महिलांनी सामूहिक स्वाक्षऱ्या करून पोलीस प्रशासनाकडे निवेदन सादर केले. गावातील दारूविक्री व संबंधित परवानग्यांबाबत शासनाच्या नियमानुसार कठोर कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

----------------------------------------------------------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande