रक्षाबंधनाची खास भेट! ‘माँ जिजाऊ’च्या २५ नवीन एसटी बसेस अमरावतीच्या सेवेत
- आ. रवी राणा यांनी स्वतः बस चालवून केले उद्घाटन अमरावती, 28 ऑगस्ट (हिं.स.)। रक्षाबंधनाच्या पावन पर्वानिमित्त अमरावती जिल्ह्यातील महिला भगिनींसाठी राज्य सरकारकडून विशेष भेट देण्यात आली असून, जिल्ह्यासाठी तब्बल २५ नवीन ‘माँ जिजाऊ’ एसटी बसेस उपलब्ध
रक्षाबंधनाची खास भेट! ‘माँ जिजाऊ’च्या २५ नवीन एसटी बसेस अमरावतीच्या सेवेत; आ. रवी राणा यांनी स्वतः बस चालवून केले उद्घाटन


- आ. रवी राणा यांनी स्वतः बस चालवून केले उद्घाटन

अमरावती, 28 ऑगस्ट (हिं.स.)।

रक्षाबंधनाच्या पावन पर्वानिमित्त अमरावती जिल्ह्यातील महिला भगिनींसाठी राज्य सरकारकडून विशेष भेट देण्यात आली असून, जिल्ह्यासाठी तब्बल २५ नवीन ‘माँ जिजाऊ’ एसटी बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या बसेसमुळे ग्रामीण भागातील महिला, विद्यार्थी तसेच सर्वसामान्य प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित, सुलभ आणि सुविधाजनक होणार आहे. बडनेरा बस डेपो येथे नव्याने दाखल झालेल्या पाच एसटी बसेसच्या लोकार्पणाचा कार्यक्रम आमदार रवी राणा यांच्या हस्ते उत्साहात पार पडला.या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे आमदार रवी राणा यांनी स्वतः नवीन एसटी बसचे स्टेअरिंग हातात घेत बस चालवून नव्या बससेवेचा शुभारंभ केला. यावेळी उपस्थित लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा देत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अमरावती जिल्ह्यातील सर्व महिला भगिनींच्या वतीने आभार मानले.यावेळी बोलताना आमदार रवी राणा म्हणाले की, रक्षाबंधनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिला भगिनींना ही आगळीवेगळी भेट दिली आहे. अमरावती जिल्ह्यासाठी २५ नवीन एसटी बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या असून, ‘माँ जिजाऊ’ या नावाने सुरू होणाऱ्या या बसेस महिला सक्षमीकरणासह सुरक्षित प्रवासाचे प्रतीक ठरतील. रक्षाबंधनाच्या दिवशी अनेक महिला आपल्या भावाला राखी बांधण्यासाठी गावागावांत प्रवास करतात. अशा वेळी त्यांना वेळेवर, सुरक्षित आणि आरामदायी प्रवासाची सुविधा मिळावी, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.या उपक्रमासाठी आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे तसेच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे विशेष आभार मानले. जिल्ह्यात दाखल झालेल्या २५ नवीन बसेसपैकी बडनेरा डेपोला मिळालेल्या पाच बसेस सेवेत दाखल झाल्याने परिसरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम होणार आहे.यावेळी एसटीचे डीसी सचिन शिरसागर, उपमहापौर सचिन भेंडे, गटनेते नाना आमले, नगरसेवक अजय जयस्वाल, किशोर जाधव, नगरसेविका रजनी डोंगरे, गौरी मेघवानी, मीरा कांबळे तसेच बडनेरा डेपो व्यवस्थापक पवन देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande