मोहोळ शहरातील सर्व्हिस रोड अतिक्रमणमुक्त; पोलिस निरीक्षकांच्या मोहिमेचा परिणाम
सोलापूर, 28 ऑगस्ट (हिं.स.)। मोहोळ शहरातील वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या सर्व्हिस रोडवरील अतिक्रमणांविरोधात मोहोळ पोलिस निरीक्षक दीपक पाटील यांनी धडक मोहीम राबवली. या कारवाईमुळे अनेक दिवसांपासून अतिक्रमणांच्या विळख्यात अडकलेला सर्व्हिस रोड मोकळा झाल्या
मोहोळ शहरातील सर्व्हिस रोड अतिक्रमणमुक्त; पोलिस निरीक्षकांच्या मोहिमेचा परिणाम


सोलापूर, 28 ऑगस्ट (हिं.स.)।

मोहोळ शहरातील वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या सर्व्हिस रोडवरील अतिक्रमणांविरोधात मोहोळ पोलिस निरीक्षक दीपक पाटील यांनी धडक मोहीम राबवली. या कारवाईमुळे अनेक दिवसांपासून अतिक्रमणांच्या विळख्यात अडकलेला सर्व्हिस रोड मोकळा झाल्याने मोहोळ शहरातील रस्त्याने जणू मोकळा श्वास घेतला आहे.

सर्व्हिस रोडवर विविध प्रकारची अनधिकृत दुकाने, हातगाड्या व इतर अतिक्रमणांमुळे वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण होत होती. नागरिकांना तसेच वाहनचालकांना ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. या पार्श्वभूमीवर पोलिस निरीक्षक दीपक पाटील यांनी पुढाकार घेत अतिक्रमण हटाव मोहीम राबवली.

कारवाईनंतर रस्ता मोकळा झाल्याने वाहतूक सुरळीत होण्यास मदत झाली असून नागरिकांनीही या मोहिमेचे स्वागत केले आहे. शहरातील सार्वजनिक रस्ते अतिक्रमणमुक्त ठेवण्यासाठी अशी कारवाई सातत्याने सुरू राहावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande