हिंदू तरुणीच्या छेडछाडीच्या विरोधात पाटोदा बंद; शेकडो नागरिक पोलीस ठाण्यासमोर
बीड, 28 ऑगस्ट (हिं.स.) : बीड जिल्ह्यातील पाटोदा येथे मुलीच्या कथित छेडछाडीच्या घटनेनंतर संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेच्या निषेधार्थ शेकडो नागरिक पाटोदा पोलीस ठाण्यासमोर एकत्र आले असून, संबंधित व्यक्तीविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी करण
पाटोदा बंद


बीड, 28 ऑगस्ट (हिं.स.) : बीड जिल्ह्यातील पाटोदा येथे मुलीच्या कथित छेडछाडीच्या घटनेनंतर संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेच्या निषेधार्थ शेकडो नागरिक पाटोदा पोलीस ठाण्यासमोर एकत्र आले असून, संबंधित व्यक्तीविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.

या घटनेच्या निषेधार्थ नागरिकांकडून पाटोदा बंदची हाक देण्यात आली आहे. मोठ्या संख्येने नागरिक पोलीस ठाण्यासमोर दाखल झाल्याने परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले.

घटनेप्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू असून, संबंधित व्यक्तीविरोधात कायदेशीर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. परिस्थितीवर पोलिसांकडून लक्ष ठेवण्यात येत आहे.

---------------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande