मुंबई आणि मडगांव दरम्यान मरेच्या ४ अतिरिक्त गणपती विशेष गाड्या चालवणार
मुंबई, 28 ऑगस्ट (हिं.स.) - मध्य रेल्वेकडून गणेशोत्सव काळात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - मडगांव - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान विशेष गाडी (४ सेवा) सोडल्या जाणार आहेत. गाडी क्रमांक 01007 विशेष गाडी दिनांक ११.०९.२०२६ आणि दिनांक १३.०९.२०२
Express


मुंबई, 28 ऑगस्ट (हिं.स.) - मध्य रेल्वेकडून गणेशोत्सव काळात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - मडगांव - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान विशेष गाडी (४ सेवा) सोडल्या जाणार आहेत.

गाडी क्रमांक 01007 विशेष गाडी दिनांक ११.०९.२०२६ आणि दिनांक १३.०९.२०२६ रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ००.४० वाजता सुटेल आणि मडगांव येथे त्याच दिवशी १५.३० वाजता पोहोचेल. (२ सेवा)

गाडी क्रमांक 01008 विशेष गाडी दिनांक ११.०९.२०२६ आणि दिनांक १३.०९.२०२६ रोजी मडगांव येथून १६.३० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी ०८.१५ वाजता पोहोचेल. (२ सेवा)

थांबे: दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरावली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलावडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवि आणि करमळी.

गाडीची संरचना: २ वातानुकूलित तृतीय, १२ शयनयान, ६ सामान्य द्वितीय श्रेणी आणि २ द्वितीय आसनासह गार्ड्स ब्रेक व्हॅन.

आरक्षण: गाडी क्रमांक 01007 गणपती आरक्षित विशेष गाडीसाठी आरक्षण सर्व पीआरएस केंद्रांवर आणि आयआरसीटीसी च्या संकेतस्थळावर (www.irctc.co.in) दिनांक २९.०८.२०२६ रोजी सुरू होईल.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande