कर्ज न घेतलेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याची मागणी
बीड, 28 ऑगस्ट (हिं.स.)। सरकारकडून कर्जमाफीचा गवगवा करून स्वतःची पाठ थोपटली जात आहे. मात्र, कर्ज घेऊन ते थकवलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळत असताना, स्वतःच्या पैशातून शेती करणाऱ्या आणि कर्ज न घेणाऱ्या शेतकऱ्यांचे काय, असा सवाल शेतकरी बांधवांकड
दुष्काळाचे सावट


बीड, 28 ऑगस्ट (हिं.स.)। सरकारकडून कर्जमाफीचा गवगवा करून स्वतःची पाठ थोपटली जात आहे. मात्र, कर्ज घेऊन ते थकवलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळत असताना, स्वतःच्या पैशातून शेती करणाऱ्या आणि कर्ज न घेणाऱ्या शेतकऱ्यांचे काय, असा सवाल शेतकरी बांधवांकडून उपस्थित केला जात आहे.

दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कर्ज घेऊन शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या माध्यमातून दिलासा मिळू शकतो; मात्र कर्ज न घेता स्वतःच्या पैशातून शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना पिकांच्या नुकसानीनंतर कोणता आधार मिळणार, हा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

“कर्ज घेतले, थकवले आणि कर्जमाफी मिळाली—त्यांची सोय झाली; मात्र ज्यांनी कर्जच घेतले नाही, त्यांनी दुष्काळात पिके वाया गेल्यानंतर जगायचे कसे?” असा सवाल शेतकरी बांधवांकडून केला जात आहे.

सरकारने केवळ कर्जमाफीपुरते मर्यादित न राहता, कर्ज न घेतलेल्या आणि दुष्काळामुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनाही योग्य नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी बांधवांकडून करण्यात येत आहे.

------------------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande