
छत्रपती संभाजीनगर, 28 ऑगस्ट (हिं.स.)।
माजी विरोधी पक्षनेते आमदार अंबादास दानवे यांच्या उपस्थितीत
छत्रपती संभाजीनगर पश्चिम विधानसभा मतदारसंघातील शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या प्रभागनिहाय बैठका संपन्न झाल्या.यावेळी आगामी संघटनात्मक कामकाज, पक्षाची भूमिका आणि प्रभागनिहाय आढावा याबाबत पदाधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करण्यात आली. पक्ष संघटना अधिक सक्षम करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने आणि जोमाने काम करण्याचे आवाहन करण्यात आले.
याप्रसंगी शिवसेना उपनेते सुभाष पाटील, जिल्हा संघटक सुदाम सोनवणे, उपजिल्हाप्रमुख किशोर कच्छवाह,शहरप्रमुख हरिभाऊ हिवाळे, विधानसभाप्रमुख प्रमोद ठेंगडे, मनपा गटनेते गणेश लोखंडे, विधानसभा संघटक गिरीश चपळगावकर,राहुल वाणी,सुभाष शेजवळ, नरेश मगर,दिनेशराजे भोसले, वसंत शर्मा, अजय चोपडे, नितीन पवार, नरेंद्र देवत्त्ववाल, प्रकाश कमलानी, गजेंद्र दळवी, गोरख सोनवणे, सुधीर जाधव,महिला आघाडी जिल्हा संघटक आशा दातार,शहर संघटक राजश्री पगार, युवतीसेना सानिका देवराज व कोमल पांढरे उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis