यवतमाळातील वकील संघाच्या पदाधिकाऱ्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
यवतमाळ, 28 ऑगस्ट (हिं.स.)। येथील वकील संघाच्या पदाधिकाऱ्यांसह विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी काँग्रेस पक्षाचे गोवा, दीव, दमण, दादरा-नगर हवेलीचे प्रभारी माणिकराव ठाकरे यांच्या उपस्थिती काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेसची विचारधारा, सर्वधर्मसमभाव,
वकील संघाचे पदाधिकारी काँग्रेसमध्ये


यवतमाळ, 28 ऑगस्ट (हिं.स.)। येथील वकील संघाच्या पदाधिकाऱ्यांसह विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी काँग्रेस पक्षाचे गोवा, दीव, दमण, दादरा-नगर हवेलीचे प्रभारी माणिकराव ठाकरे यांच्या उपस्थिती काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेसची विचारधारा, सर्वधर्मसमभाव, लोकशाही मूल्ये, सामाजिक एकतेच्या भूमिकेवर विश्वास व्यक्त करीत आम्ही पक्षात प्रवेश करीत असल्याचे वकील संघाच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी येथील वकील संघाचे तालुका अध्यक्ष अॅड. गोपाल डहाके, अॅड. मंगेश कदम, सहदेव पवार, युवराज महल्ले, धीरज धावडे, किसन भणक आदींसह अनेकांनी माजी मंत्री माणिकराव ठाकरे यांच्या उपस्थिती काँग्रेमध्ये प्रवेश घेतला. काँग्रेसची विचारधारा सर्वसामान्यांना सोबत घेऊन जाणारी आहे. सर्वधर्मसमभाव, लोकशाही, सामाजिक एकतेच्या विचारांनी प्रेरित होऊन आम्ही काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. आगामी काळात तालुक्यासह लोही जिल्हा परिषद सर्कलमध्ये पक्षाची संघटनात्मक वाढ करण्यासाठी पूर्ण ताकदीने काम करू, असे विचार अॅड. गोपाल डहाके यांनी यावेळी व्यक्त केले. प्रवेश सोहळ्याला तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष गजानन बिबेकर, युवक काँग्रेसचे अध्यक्ष अतुल राऊत आदींसह अनेकांची उपस्थिती होती.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande