भरधाव बलेनो कार थेट मेडिकलमध्ये घुसली; सुदैवाने जीवितहानी टळली
अमरावती, 28 ऑगस्ट (हिं.स.) : शहरातील कठोरा नाका परिसरात एका भरधाव बलेनो कारचा चालकावरील ताबा सुटल्याने कार थेट आरोग्य भारती मेडिकलमध्ये घुसल्याची घटना घडली. या अपघातामुळे परिसरात काही काळ एकच खळबळ उडाली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाह
भरधाव बलेनो कार थेट मेडिकलमध्ये घुसली; सुदैवाने जीवितहानी टळली


अमरावती, 28 ऑगस्ट (हिं.स.) : शहरातील कठोरा नाका परिसरात एका भरधाव बलेनो कारचा चालकावरील ताबा सुटल्याने कार थेट आरोग्य भारती मेडिकलमध्ये घुसल्याची घटना घडली. या अपघातामुळे परिसरात काही काळ एकच खळबळ उडाली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, कठोरा नाका परिसरातील रस्त्यालगत आरोग्य भारती मेडिकल आहे. मेडिकलचा परिसर रस्त्याच्या पातळीपेक्षा काहीसा खाली असल्याने भरधाव आलेल्या बलेनो कारवरील चालकाचे नियंत्रण सुटले. त्यानंतर कार थेट मेडिकलच्या शटरपर्यंत घुसली. अचानक घडलेल्या या घटनेमुळे मेडिकलमधील कर्मचारी तसेच परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातानंतर कार अडकून पडल्याने ती बाहेर काढण्यासाठी क्रेनची मदत घेण्यात आली. अखेर क्रेनच्या माध्यमातून कार सुरक्षितपणे मेडिकलच्या परिसरातून बाहेर काढण्यात यश आले. अपघातात मेडिकलचे नुकसान झाले असले तरी सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. ---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande