भाजपची सोलापूर जिल्हा ग्रामीण कोअर कमिटी जाहीर
प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या आदेशानुसार नियुक्त्या; शहरी आमदारांचा समावेश नाही सोलापूर, 28 ऑगस्ट (हिं.स.) : भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या आदेशानुसार सोलापूर जिल्ह्याची ग्रामीण भागासाठीची कोअर कमिटी जाहीर करण्यात
Jdjd


प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या आदेशानुसार नियुक्त्या; शहरी आमदारांचा समावेश नाही

सोलापूर, 28 ऑगस्ट (हिं.स.) : भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या आदेशानुसार सोलापूर जिल्ह्याची ग्रामीण भागासाठीची कोअर कमिटी जाहीर करण्यात आली आहे. भाजपचे प्रदेश सरचिटणीस निरंजन डावखरे यांनी या कमिटीची यादी प्रसिद्ध केली.

या कोअर कमिटीमध्ये जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, जिल्हा प्रभारी तथा आमदार गोपीचंद पडळकर, जिल्हा सरचिटणीस विकास वाघमारे, प्रदीप पाटील आणि संतोष मोगले यांचा समावेश आहे.

केंद्र व राज्यातील मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचाही कमिटीमध्ये समावेश करण्यात आला आहे. तसेच ज्येष्ठ आमदार सुभाष देशमुख, आमदार सचिन कल्याणशेट्टी आणि आमदार समाधान अवताडे यांना स्थान देण्यात आले आहे.

ज्येष्ठ नेत्यांमध्ये माजी आमदार प्रशांत परिचारक आणि डॉ. जयसिद्धेश्वर स्वामी यांचा समावेश करण्यात आला आहे. आजी-माजी पदाधिकाऱ्यांनाही या कोअर कमिटीमध्ये स्थान देण्यात आले आहे.

दरम्यान, ही कमिटी प्रामुख्याने ग्रामीण भागासाठी असल्याने शहरातील आमदार विजयकुमार देशमुख आणि देवेंद्र कोठे यांचा या यादीत समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे भाजपच्या ग्रामीण संघटनात्मक बांधणीवर या नव्या कोअर कमिटीची जबाबदारी राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

-------------------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande