सरकारकडे रस्ते बनवायला पैसे, पण कर्जमाफीसाठी नाही - सुप्रिया सुळे
निफाड, 30 ऑगस्ट (हिं.स.)। : या सरकारकडे रस्ते बनवण्यासाठी निधी उपलब्ध आहे; परंतु कष्टकरी बळीराजाची सरसकट कर्जमाफी करण्यासाठी पैसे नाहीत. अत्रदाता सुरखी झाला पाहिजे आणि कांद्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटला पाहिजे, यासाठी आम्ही संसदेत सातत्याने आवाज
सुप्रिया सुळे


निफाड, 30 ऑगस्ट (हिं.स.)।

: या सरकारकडे रस्ते बनवण्यासाठी निधी उपलब्ध आहे; परंतु कष्टकरी बळीराजाची सरसकट कर्जमाफी करण्यासाठी पैसे नाहीत. अत्रदाता सुरखी झाला पाहिजे आणि कांद्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटला पाहिजे, यासाठी आम्ही संसदेत सातत्याने आवाज उठवत आहोत, असे प्रतिपादन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले. निफाड येथील उपबाजार आवारात आयोजित 'विनायकदादा पाटील प्रतिष्ठान'च्या शुभारंभ सोहळ्यात त्या प्रमुख अतिथी म्हणून बोलत होत्या.

भाषणादरम्यान मराठी भाषेच्या संवर्धनावर भर देत खासदार सुळे म्हणाल्या, नाशिक ही कुसुमाग्रजांची भूमी आहे. मराठी ही आपली आई आहे, त्यामुळे मावशीवर प्रेम करताना आईला विसरू नका. सध्याच्या सोशल मीडिया आणि रीलच्या युगात नवीन पिठी वाचनापासून दूर जात मातृभाषा विसरत चालली आहे. यशवंतराव चव्हाणांनी मराठी भाषेचा गोडवा कायम जपला. खासदार भगरे संसदेत मराठीतूनच प्रश्न मांडतात. पहिली भाषा ही नेहमी मातृभाषाच असायला हवी. तसेच विनायकदादा पाटील यांच्यासोबतच्या कौटुंबिक जिव्हाळ्याच्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला.

खासदार भास्कर भगरे म्हणाले की, विनायकदादा पाटील यांनी तालुक्याच्या विकासाला मोठी चालना दिली. हे प्रतिष्ठान त्यांच्या विचारांचा व कायांचा वारसा नवीन पिढीपर्यंत पोहोचवेल. आमदार दिलीप बनकर म्हणाले की, विनायकदादा म्हणजे चालते-बोलते व्यासपीठ आणि सर्वांना आधार देणारे नेतृत्व होते. शरद पवार आणि त्यांची मैत्री सर्वश्रुत होती. प्रा. डॉ. हर्षाली पाटील यांनी विनायकदादांच्या जीवनकार्यावर प्रकाशझोत टाकला.

---------------

हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI


 rajesh pande