जायकवाडी धरणाचे १८ दरवाजे उघडले; गोदावरीत १० हजार क्युसेकने विसर्ग सुरू
छत्रपती संभाजीनगर, 04 ऑगस्ट (हिं.स.)। मराठवाड्याची जीवनवाहिनी असलेल्या जायकवाडी धरणाचे १८ दरवाजे उघडून गोदावरी नदीपात्रात १० हजार क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे धरणातील जलसाठा वाढल्
Q


छत्रपती संभाजीनगर, 04 ऑगस्ट (हिं.स.)। मराठवाड्याची जीवनवाहिनी असलेल्या जायकवाडी धरणाचे १८ दरवाजे उघडून गोदावरी नदीपात्रात १० हजार क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे धरणातील जलसाठा वाढल्याने हा निर्णय घेण्यात आला. संभाव्य पूरस्थिती लक्षात घेऊन नदीकाठच्या गावांना प्रशासनाने आधीच सतर्कतेचा इशारा दिला असून नागरिकांनी नदीपात्र व सखल भागात जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande