परभणी : हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन
परभणी, 05 ऑगस्ट (हिं.स.)। काँग्रेसकडून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ राााषवादीकडून बुधवारी परभणीतील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सपकाळ यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध व्यक्त करण्यात आला.
राष्ट्रवादीद्वारे हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रतिमेस जोडो मारो आंदोलन : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याविषयी केलेल्या अवमानकारक वक्तव्याचा निषेध


परभणी, 05 ऑगस्ट (हिं.स.)। काँग्रेसकडून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ राााषवादीकडून बुधवारी परभणीतील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सपकाळ यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध व्यक्त करण्यात आला.

आंदोलनादरम्यान सुनेत्रा पवार यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करून त्यांच्याप्रती आदर व्यक्त करण्यात आला. यानंतर जिल्हाधिकार्यांना निवेदन सादर करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्यांनी महिलांचा अवमान करणार्या कोणत्याही वक्तव्याचे किंवा त्याच्या समर्थनाचे समर्थन करता येणार नाही, अशी भूमिका मांडली. सार्वजनिक जीवनात महिलांचा सन्मान, सभ्यता आणि जबाबदारीचे भान राखणे आवश्यक असून, महिलांच्या सन्मानाशी तडजोड करणारी कोणतीही भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस स्वीकारणार नसल्याचे आंदोलकांनी सांगितले. हर्षवर्धन सपकाळ यांनी संबंधित वक्तव्याबाबत माफी मागेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. या आंदोलनात जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अॅड. श्रीकांत विटेकर, संतोष देशमुख, भावना नखाते, नंदा राठोड, रोहन सामाले, एम. आर. सरोदे, दीपक वारकरी, शेख अहमद, अक्षय देशमुख, अनिल गोरे, रामदास दळवे, प्रमोद भांगे, रवी चव्हाण, महेश चव्हाण, पांडुरंग टेकाळे, मुमताज शेख यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व महिला आघाडीच्या प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande