बीड - अमृता फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत मुख्यमंत्री मोफत महाआरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
बीड, 05 ऑगस्ट, (हिं.स.)। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित मुख्यमंत्री मोफत महाआरोग्य शिबिरास नागरिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. लाभार्थ्यांची वाढती संख्या आणि नागरिकांची उत्स्फूर्त उपस्थिती लक्षात घेऊन शिबिराची मुदत वा
अमृता फडणवीस


बीड, 05 ऑगस्ट, (हिं.स.)। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित मुख्यमंत्री मोफत महाआरोग्य शिबिरास नागरिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. लाभार्थ्यांची वाढती संख्या आणि नागरिकांची उत्स्फूर्त उपस्थिती लक्षात घेऊन शिबिराची मुदत वाढविण्यात आली असून, आता हे शिबिर दि. ६ व ७ ऑगस्ट २०२६ रोजीही सुरू राहणार आहे.

सौ.अमृता देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात त्यांचा आ. सुरेश धस यांनी फेटा व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. त्यांनी या जनहिताच्या उपक्रमाचे मनापासून कौतुक करत नागरिकांच्या आरोग्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच शिबिरास आवर्जून उपस्थित असलेले पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांचा देखील सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी डॉ. अभय ठाकूर (लॅप्रोस्कोपिक सर्जन,पुणे), डॉ. शैलेश पुणतांबेकर (कर्करोग तज्ज्ञ), डॉ. संजीव ठाकूर (लॅप्रोस्कोपिक सर्जन), डॉ. रणजित जगताप (हृदयरोग तज्ज्ञ), रामेश्वर भाऊ नाईक (प्रमुख, मुख्यमंत्री सहायता कक्ष, महाराष्ट्र राज्य), रितेश पाटील साहेब (समन्वयक, मुख्यमंत्री सहायता कक्ष, महाराष्ट्र राज्य), माजी आमदार साहेबराव (नाना) दरेकर, ॲड. साहेबराव म्हस्के, दत्ताभाऊ काकडे (प्रदेशाध्यक्ष, सरपंच परिषद), अमित घाडगे (विशेष निमंत्रित सदस्य, आयुष्मान भारत), संतोष मानुरकर (अध्यक्ष, बीड जिल्हा पत्रकार संघटना), डॉ. एकनाथ पवार (अधिष्ठाता, ससून हॉस्पिटल, पुणे) आणि डॉ. मधुकर गायकवाड (अधिष्ठाता, जे. जे. हॉस्पिटल, मुंबई) यांच्यासह आष्टी शिरूर पाटोदा तालुक्यामधील सर्व आदरणीय महंत,लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, विविध शासकीय यंत्रणांचे अधिकारी, डॉक्टर्स, वैद्यकीय कर्मचारी आणि लाभार्थी नागरिक - बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande