सीजेपीची छत्रपती संभाजीनगरात दोन दिवसीय रणनीती बैठक
छत्रपती संभाजीनगर, 04 ऑगस्ट (हिं.स.)। छत्रपती संभाजीनगर येथे ५ व ६ ऑगस्ट रोजी कोकरोच जनता पक्षाची (सीजेपी) दोन दिवसीय रणनीती बैठक होणार असल्याची घोषणा पक्षाने केली. संस्थापक, प्रवक्ते आणि संघटनात्मक पदाधिकारी या बैठकीत युवक चळवळीच्या पुढील वाटचालीव
सीजेपीची छत्रपती संभाजीनगरात दोन दिवसीय रणनीती बैठक


छत्रपती संभाजीनगर, 04 ऑगस्ट (हिं.स.)। छत्रपती संभाजीनगर येथे ५ व ६ ऑगस्ट रोजी कोकरोच जनता पक्षाची (सीजेपी) दोन दिवसीय रणनीती बैठक होणार असल्याची घोषणा पक्षाने केली. संस्थापक, प्रवक्ते आणि संघटनात्मक पदाधिकारी या बैठकीत युवक चळवळीच्या पुढील वाटचालीवर चर्चा करणार आहेत.

जंतर-मंतर आंदोलनात सहभागी झालेल्या स्वयंसेवकांच्या सूचनांचाही विचार केला जाणार आहे. बैठकीनंतर देशभरातील स्वयंसेवकांशी संवाद साधण्यासाठी 'लिसनिंग टूर' आयोजित करण्यात येणार आहे. शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर युवकांचा आत्मविश्वास वाढल्याचे पक्षाचे मुख्य प्रवक्ते सौरव दास यांनी सांगितले. आगामी कार्यक्रमांची घोषणा लवकरच केली जाणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande