अमरावती-मायेचे अनोखे दान! सासूने जावयाला किडनी दान करून दिले नवजीवन
अमरावती, 04 ऑगस्ट (हिं.स.) स्थानिक विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय ( सुपर स्पेशलिटी) हॉस्पिटल अमरावती. येथे ७५ वी किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया पूर्ण करण्यात आली. रुग्ण हा काही महिन्यांपासून किडनी आजाराने त्रस्त होता. दहा वर्षांपूर्वी रुग्णाचे मु
मायेचे अनोखे दान! सासूच्या किडनीमुळे जावयाला मिळाले नवजीवन दान.


मायेचे अनोखे दान! सासूच्या किडनीमुळे जावयाला मिळाले नवजीवन दान.


अमरावती, 04 ऑगस्ट (हिं.स.) स्थानिक विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय ( सुपर स्पेशलिटी) हॉस्पिटल अमरावती. येथे ७५ वी किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया पूर्ण करण्यात आली. रुग्ण हा काही महिन्यांपासून किडनी आजाराने त्रस्त होता. दहा वर्षांपूर्वी रुग्णाचे मुंबई येथे एक किडनी प्रत्यारोपण झाले होते. पण काही कारणाने दहा वर्षानंतर पुन्हा रुग्णाची किडनी निकामी झाली. त्यासाठी बाहेर उपचार पद्धती चालू होती व काही महिन्यांपासून डायलिसिस करत होता . तेव्हा डॉक्टरांनी रुग्णास व त्याच्या कुटुंबियांस विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय ,अमरावती येथे आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून होत असलेल्या यशस्वी व विनामूल्य शस्त्रक्रिया यासाठी रुग्ण विविध जिल्ह्यांमधून नव्हे तर इतर राज्यामधून सुद्धा येत असतात याविषयी महिती दिली. तेव्हा रुग्णालयात झालेले ७५ वे किडनी प्रत्यारोपण, हे ४० वर्षीय देवानंद किसन चव्हाण यांची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली आहे.

रुग्ण हा रा. पारडी ता. अचलपूर , जि. अमरावती येथील रहिवासी असून मागील काही महिन्यांपासून डायलिसिस चालु होते. मात्र डायलिसिस यावर दीर्घकाळ उपाय नसून व होणारा त्रास बघुन किडनी प्रत्यारोपण हा यावरील योग्य उपाय आहे, असे जेव्हा डॉक्टरांनी सांगितले त्यावेळी जावयाच्या व मुलीच्या पुढील भविष्याचा विचार करून सासू रंजना श्रीराम सोळंके (५५) यांनी आपली एक किडनी जावई देवानंदला देण्याचा निर्णय घेतला, व आपली एक किडनी देवानंद ला देऊन त्याला नवीन जीवन दिले. ही शस्त्रक्रिया अत्यंत जटिल व गुंतागुंतीची होती जी रुग्णालयातील तज्ञ डॉक्टरांच्या चमूने यशस्वीरित्या पार पाडली.आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजने अंतर्गत शस्त्रक्रिया विनामुल्य करण्यात आली.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande